पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून पहिलं वहिलं शतक अय्यरसह संघासाठीही 'स्पेशल'

श्रेयस अय्यर

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सलामी सामन्यात माफक धावा करुन सलामीवीरांनी मैदान सोडले. बिकट परिस्थितीत श्रेयस अय्यरने कर्णधारासोबत शतकी खेळी केली. एवढेच नाही कोहली अर्धशतकानंतर तंबूत परतल्यानंतर अय्यरने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक साजरे केले. यासाठी त्याने १०१ चेंडूंचा सामना केला. त्याच्या या शतकी खेळीमध्ये ११ चौकारासह एका षटकाराचा समावेश आहे. तब्बल १६ महिन्यानंतर भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाने शतक झळकावले आहे. अय्यरपूर्वी अंबाती रायडूने २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यामुळे या शतकाला विशेष महत्त्व आहे. 

NZvs IND 1st ODI : सलामीच्या वनडे सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर

यापूर्वी श्रेयस अय्यरची ८८ ही सर्वोच्च धावसंख्या होती. आपला या रेकॉर्डमध्ये सुधारणा करत त्याने आपण चौथ्या क्रमांकासाठी परिपक्व असल्याचे दाखवून दिले. मागील वर्षी इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकापूर्वीपासून भारतीय संघ चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूच्या शोधात होता. या जागेसाठी अनेक पर्यांचा प्रयोग झाला. अखेर ही जागा माझीच असल्याचे श्रेयस सिद्ध करताना दिसत आहे. त्याची आजची खेळी याचाच नमुना पेश करणारी होती.  

INDvsPAK : पाकच्या युवा फलंदाजांनी 'रन आउट'ची परंपरा जपली?

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही श्रेयस अय्यरने दमदार कामगिरीचा नजराणा दाखवून दिला होता. २९ चेंडूत ५८ धावा करुन त्याने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. श्रेयस अय्यरने ४ नोव्हेंबर २०१७ मध्ये राजकोटच्या मैदानातून न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर  श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याला संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील अपयशानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने ८८ धावांची खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs New Zealan A rise and shine for Shreyas Iyer A century for India No 4 after 464 days