पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोचिंग म्हणजे ब्रेडवर बटर लावण्यासारखं नाहीः रवी शास्त्री

विराट कोहली आणि रवी शास्त्री

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तिथे ते ५ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहेत. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडिया सध्या २-० ने आघाडी घेतलेली आहे. याचदरम्यान टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी टीममधील आपल्या भूमिकेबाबत सांगितले आहे. आयसीसी विश्वचषक २०२०च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतरही गेल्या वर्षी रवी शास्त्रींना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली होती. शास्त्रींना फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक एस श्रीधर हे मदत करतात. मग अशा वेळी रवी शास्त्रींची भूमिका काय आहे?

बिहारमध्ये कोरोना विषाणू: चीनवरुन आलेल्या विद्यार्थिनीत आढळली लक्षणे

यावर शास्त्रींनी 'हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'कोणत्याही परिस्थितीत टीमला सुस्थितीत ठेवणे हीच आम्हा सर्वांची भूमिका आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी नंतर मोठ्या होतात. हातात छडी न घेता टीमला कायम सतर्क ठेवणे हे आमचे काम आहे.' 

तुम्हाला एका खेळाडूकडे जाऊन काही सांगावे लागत नाही. जर तुमच्याकडे एखाद्या समस्येवर तोडगा असेल तर तुम्ही खेळाडूकडे जाऊ शकता. मी कधीच कोणत्या खेळाडूकडे जात नाही. जोपर्यंत माझ्याकडे त्याचा उपाय नाही, तोपर्यंत मी कधीच त्यांना म्हणत नाही की तुम्ही हे चुकीचे करत आहात. 

सात क्षेत्रांत साडेतीन कोटी लोक बेरोजगार, प्रियांका गांधींचा सरकारवर हल्ला

५७ वर्षीय रवी शास्त्री म्हणाले की, 'तुम्ही एक संघ म्हणून कशी फलंदाजी करता, कशी गोलंदाजी करता. तुम्ही एकमेकांसाठी कसे खेळता. तुम्ही खेळ कसा पुढे नेता. चांगली सुरुवात कशी करता. विरोधी संघाच्या २० विकेट कशा घेऊ शकता, हा सर्व विचार करावा लागतो. हे काम ब्रेडवर बटर लावण्यासारखे असेल असे जर कोणाला वाटत असेल तर तो पुढे जाऊ शकतो.'

प्रशिक्षणाचे काम अजिबात रटाळ नाही, असेही ते म्हणाले. तुम्ही दररोज एखादी गोष्ट पुन्हा-पुन्हा करता. पण खेळाडुंना सातत्याने आठवण करुन देऊन त्यांनी काय केले पाहिजे, हे सांगणे माझे काम आहे.

काँग्रेसने PM मोदींना पाठवली संविधानाची प्रत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs bew zealand head coach Ravi Shastri on his role in team india says if anyone thinks we put butter on bread take a walk