पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsBAN : टीम इंडियाचा विश्वविक्रमी चौकार

भारतीय संघाने कोलकाताचे मैदानही मारले

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने  ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात एक डाव आणि ४६ धावांनी विजय नोंदवला. दुसरा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने मालिका २-० अशी खिशात घातली. प्रतिस्पर्धी संघाला डावाने पराभूत करण्याचा भारताचा हा सलग चौथा विजय आहे.  

INDvs BAN : ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियाचा 'विराट' विजय

इंदूरच्या मैदानावर रंगलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी  सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी विजय नोंदवला होता. कोलकाताच्या मैदानावर पुन्हा दिमाखदार विजय नोंदवत भारतीय संघाने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. सलग चार कसोटीत एक डाव राखून विजय मिळवणारा भारत एकमेव संघ आहे. 

INDvsBAN: अबतक ७०, गुलाबी चेंडूवर किंग कोहलीचे शतक

यापूर्वी घरच्या मैदानावर खेळताना भारताने आफ्रिकेला शह दिला होता. पुण्याच्या मैदानात भारताने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि १३७ धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर रांचीच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्ध भारताने एक डाव आणि २०२ धावांनी मोठा विजय नोंदवला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs bangladesh team india creates history as register four consecutive innings win in test cricket