पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs BAN : ...म्हणून सामन्यांच्या तिकिटांची किंमत सर्वांत कमी

भारत विरुद्ध बांगलादेश

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्याच डे- नाइट सामन्याला  ३ नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. हा सामना नेहमीच्या वेळेपेक्षा १ तास आधी सुरु होणार असल्याची माहिती कॅब ( क्रिकेट असोशिएशन ऑफ बंगाल)चे सचिव अभिषेक दालमिया यांनी दिली आहे. या ऐतिहासिक सामन्यांच्या तिकिटांची विक्री ही सर्वांत कमी किमतीत होणार आहे. 

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी

या सामन्यांच्या  तिकिटांचे दर ५० रुपयांपासून सुरू होतं आहेत. ६८ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या इडन गार्डनमध्ये रंगणाऱ्या या सामन्याच्या तिकिटांचे दर ५०, १०० आणि १५० रुपये ठेवण्यात आले आहेत.  

कसोटीत सर्वाधिक शतकं झळकवणारे 'चार' सलामीवीर

प्रेक्षकांचा विचार करुनच तिकिटांचे दर आणि सामन्याची वेळ ठरवण्यात आली असल्याची माहिती कॅबनं दिली. सामना हा दीड वाजता सुरू होणार आहे. जो रात्री ८.३० पर्यंत संपण अपेक्षित आहे.  सामना लवकर संपल्यामुळे प्रेक्षकांना लवकर घरी जाता येईल, प्रेक्षकांची गैरसोय टळेल, त्याचप्रमाणे तिकीट ही सर्वसामान्यांना परवडणारी असल्यानं प्रेक्षकही जास्त येतील त्यामुळे तिकीटांचे दर कमी ठेवण्यात आले आहेत.