पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनी-लोकेशनंतर कुलदीप-चहलची कमाल, भारताची सराव मोहीम फत्ते!

कुलदीप यादव

विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला भिडण्यापूर्वी कार्डिफच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशला ९५ धावांनी पराभूत केले. लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर ३६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ४९.३ षटकात २६४ धावांत आटोपला. 

भारताने दिलेल्या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशच्या सलामीने चांगली सुरुवात केली. ही भागीदारी अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना बुमराहने सोम्मया सरकारला धावांवर बाद केले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या शाकिबला बुमराने खातेही उघडू दिले नाही. तो आल्या पावली माघारी परतला. दोन गडी लागोपाड तंबूत परतल्यानंत सलामीवीर लिटॉन दास (७३) आणि मुसफिकूर रहिम (९०)  यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही दोघे तंबूत परतल्यानंतर अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. मेहंदी हसन (२७) आणि मोहम्मद सैफुद्दीन (१८) धावा वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडी धावसंख्या करण्यातही यश आले नाही. 
भारताकडून कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी तीन, बुमराहने दोन तर रविंद्र जडेजाने एक बळी टीपला. 

Most Sixes Record In WC : षटकारांच्या आतषबाजीच्या विक्रमावर एक नजर

नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. लोकेश राहुल आणि धोनीच्या शतकाच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ७ बाद ३५९ धावा केल्या. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या एका धावेवर तंबूत परतला. त्यानंतर रोहित शर्माही १९ धावांवर बाद झाला. सलामीची जोडी माघारी फिरल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने लोकेश राहुलच्या साथीने भारतीय डावाला आकार दिला. कोहलीने ४६ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने ४७ धावांचे योगदान दिले.

लोकेश राहुलने चौथ्या क्रमांकाची समस्या दूर झाल्याचे संकेत आपल्या शतकी खेळीतून दिले आहेत. त्याने ९९ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने १०८ धावांची खेळी केली. दुसरीकडे अष्टपैलु विजय शंकला संधीचं सोन करता आले नाही. तो अवघ्या दोन धावांची भर घालून परतला. धोनीनेही या सामन्यात आपले रंग दाखवले. ७८ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारासह ११३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.  याशिवाय हार्दिक पांड्या ११ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २१ धावा करुन तंबूत परतला.  दिनेश कार्तिक ७ आणि जडेजा ११ धावांवर नाबाद राहिले. 

शेन वॉर्न म्हणतो, धोनी जैसा कोई नहीं!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs Bangladesh Live Score ICC World Cup Warm up Cricket Match 2019 in Cardiff Vijay Shankar returns