पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पहिल्या दिवस-रात्र कसोटीचे पेस-गोपीचंद-सानियाला निमंत्रण

पहिल्या दिवस-रात्र कसोटीचे पेस-गोपीचंद-सानियाला निमंत्रण

ईडन गार्डन्स स्टेडिअमवर २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान बांगलादेशबरोबर भारतीय क्रिकेट संघात पहिली दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे. या सामन्यासाठी दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि भारताचा राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

चक दे इंडिया! भारतीय महिलांसमोर अमेरिकन महिला हतबल

बंगाल क्रिकेट संघाने या सामन्यादरम्यान भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खेळाडुंचा- पीव्ही सिंधू, एमसी मेरी कोम आणि एकमेव वैयक्तिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा यांना सन्मानित केले जाणार आहे.

या सामन्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना याही भारतात येणार आहेत. पण त्या फक्त पहिल्या दिवसाच खेळ पाहतील. त्याचबरोबर बीसीसीआयने सचिन तेंडुलकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या सामन्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऐतिहासिक कसोटीसाठी PM मोदींसह सचिनही उपस्थित राहणार?

त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही या सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.