पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs BAN: याबाबतीत दोघांशिवाय बाकी सर्व अनुभव शून्य!

डे नाइट कसोटी सामन्यासाठी गुलाबी चेंडूचा वापर केला जातो

भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा संघ दिल्लीमध्ये दाखल झाला आहे. दिल्लीच्या मैदानातून टी-२० च्या मालिकेने सुरुवात होणाऱ्या दौऱ्याचा समारोप हा कोलकाताच्या मैदानात होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. विशेष म्हणजे २२ नोव्हेंबर पासून कोलकाताच्या ईडन गार्डनच्या मैदानात रंगणारा कसोटी सामना हा डे नाइट खेळवण्यात येणार आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघासाठी हा पहिला डे नाइट कसोटी सामना ठरणार आहे.  

या सामन्यात गुलाबी रंगाचा एसजी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. इंदोर कसोटीमध्ये लाल रंगाच्या एसजी चेंडू वापरण्यात येईल. दोन्ही देशातील बहुतेक खेळाडूंना गुलाबी रंगाच्या चेंडूवर खेळण्याचा अनुभव नाही.  भारतीय संघातील ऋद्धिमान साहा आणि मोहम्मद शमी यांनी गुलाबी चेंडूवर काही सामने खेळले आहेत. 

कृपया माझ्या नावाचा वापर करु नका, अनुष्काच्या भावनांचा बांध फुटला

भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लाल रंगाच्या एसजी चेंडूचा वापर करण्यात येतो. परंतु बीसीसीआयने स्थानिक कसोटी क्रिकेटमध्ये गुलाबी रंगाचा कूकाबुरा चेंडू वापरला होता. स्थानिक स्तरावर कोलकातामध्येच पहिला डे नाइट कसोटी सामना खेळवण्यात आला होता. यावेळी कूकाबुराचा गुलीबी चेंडू वापरण्यात आला होता. मालिकेतील दोन सामन्यात वेगवेगळ्या चेंडूचा वापर करता येत नसल्यामुळे डे नाइट कसोटीसाठी कूकाबुराऐवजी एसजीचा गुलाबी चेंडू वापरण्यात येणार असल्याचे गांगुलींनी म्हटले आहे.  

दीर्घकालीन रजेमुळे द्रविड दुहेरी लाभाच्या आरोपातून निर्दोष ठरणार?

क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत  ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ५ तर पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी ३-३ तर न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका यांनी प्रत्येकी २ आणि झिम्बाब्वेने एक सामना खळला आहे.