पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फिफा वर्ल्ड कप पात्रता : अखेरच्या क्षणी भारताचा पराभव टळला, पण...

भारताने सामना अनिर्णित राखला.

अखेरच्या क्षणाला आदिल खानने डागलेल्या गोलच्या जोरावर भारताने फिफा विश्वचषक पात्रता सामन्यात बांगलादेशला १-१ बरोबरीत रोखले. कोलकाताच्या मैदानात मंगळवारी रंगलेल्या सामन्यात पराभव टळला असला तरी फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. कतार विरुद्धच्या अनिर्णित निकालानंतर भारताला या सामन्यात विजयाची आवश्यकता होती. 

सचिन, लाराची फटकेबाजी पुन्हा पाहायला मिळणार

या सामन्यात भारताला अनेक गोल करण्याच्या संधी मिळाल्या. मात्र त्याचा फायदा उठवण्यात संघ अपयशी ठरला. एवढेच नाही तर बांगलादेशला गोल करण्याची एक आयती संधी दिली. आतापर्यंतच्या तीन सामन्यानंतर दोन गुणासह भारतीय संघ 'इ' गटात चौथ्या स्थानावर आहे. या गटात कतार (१०) पहिल्या स्थानावर आहे, ओमन दुसऱ्या (६) अफगाणिस्तान (३), तिसऱ्या स्थानावर आहे. भारत चौथ्या स्थानवर असून बांगलादेश एका गुणासह तळाला आहे.  

प्रो-कबड्डीची दंगल! चार संघ फायनल गाठण्यासाठी घेणार 'पंगा'

बांगलादेशच्या  साद उदीनने ४२ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीच सोनं करत भारताला बॅकफूटवर टाकले. भारतीय संघ सामना गमावण्याची भीती निर्माण झाली असताना ८९ व्या मिनिटाला आदिल खानने गोल नोंदवत सामना बरोबरीत सोडवण्यात मोलाचा वाटा उचलला. मागील २० वर्षांपासून भारतीय संघाला बांगलादेशला नमवण्यात अपयश ठरत आहे.