INDvBAN Day-Night Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या मैदानात रंगणार आहे. दिवस-रात्र खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. इंदूरमधील सलामीच्या सामन्यातील विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेला भारतीय संघ मंगळवारी कोलकातामध्ये दाखल झाला. ऐतिहासिक सामन्यासाठी शहरात दाखल झालेल्या संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. २२ नोव्हेंबरपासून दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे टू उस्मानाबाद सायकल
कर्णधार विराट कोहली, उप-कर्णधार अजिंक्य राहणे ही दोघे एकत्रपणे कोलकातामध्ये पोहचले. तर संघातील बाकी खेळाडू एकत्रितपणे कोलकातामध्ये दाखल झाले. भारतीय संघ कोलकातामधील हॉटेलमध्ये दाखल झाल्याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये फिरकीपटू अश्विन हातामध्ये पांढऱ्या रंगाची उशी घेऊन आल्याचे पाहायला मिळते. तिच्यामुळे म्हणजेच हातातील त्या उशीमुळे अश्विनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. क्रिकेट चाहत्यांच्या काही मजेशीर प्रतिक्रिया देखील या व्हिडिओवर उमटताना दिसत आहेत.
स्वप्नातही अंजिक्यला पिंक बॉलच दिसतोय
२० आणि २१ नोव्हेंबरला दोन्ही संघ ईडन गार्डनच्या मैदानात सराव करताना दिसणार आहेत. दिवस-रात्र होणाऱ्या पहिला सामना हा दुपारी १ वाजल्यापासून सुरु होईल. बांगलादेशच्या संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत संघर्षमयी खेळ केला होता. मात्र त्यांना कसोटीमध्ये एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र कोलकाताच्या मैदानात दोन्ही संघासाठी एक वेगळा माहोल असेल. यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
#TeamIndia have arrived here in Kolkata for the #PinkBallTest#INDvBAN pic.twitter.com/fAoCdBM306
— BCCI (@BCCI) November 19, 2019