पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs BAN : हवेचा दर्जा खालावला, तरीही पहिला सामना दिल्लीतच होणार !

पहिला सामना दिल्लीतच होणार

दिवाळीनंतर दिल्लीतील हवेचा दर्जा प्रदूषणामुळे खालावला आहे. असं असलं तरी भारत विरुद्ध बांगलादेश टी२० सामना हा दिल्लीतच होणार आहे. दिवाळीच्यानंतर दिल्ली प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. या प्रदूषित हवेत श्वास घेणं आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यामुळे आरोग्याचा विचार करता ३ नोव्हेंबररोजी होणारा पहिला सामना दिल्लीबाहेर हलविण्यात यावा अशी चर्चा होती. यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्रही लिहिलं होतं. 

क्रिकेटपेक्षा प्रदूषणाची चिंता करायला हवी,'गंभीर' प्रतिक्रिया

गेल्या तीन चार दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावली आहे. हा प्रदूषित हवेत खेळांडूनी तीन ते चार तास देखील घालवणं त्यांच्या आरोग्यासाठी अपायकारक असू शकते, दिर्घ काळासाठी त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतात त्यामुळे सामना दिल्लीबाहेर हलविण्यात यावा अशा आशायाचं पत्र गांगुली यांना लिहिलं होतं. मात्र ३ नोव्हेंबरचा सामना हा दिल्लीतच होईल असं दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए)च्या अधिकाऱ्यांनी  हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. 

'धक्काधक्की'त बांगलादेशचा संघ दिल्लीत दाखल

आम्ही पत्राबद्दल ऐकलं, मात्र आम्हाला बीसीसीआयकडून सामना दिल्लीबाहेर हलविण्याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.  याउलट आम्हाला रविवारी होणाऱ्या सामन्यांसाठी तयारी करण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती डीडीसीएनं हिंदुस्थान टाइम्सला दिली आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs Bangladesh despite very poor air quality in Delhi First T20I to go on as per schedule