पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुलाबी चेंडूवर अर्धा संघ तंबूत धाडणारा इशांत पहिला..

इशांत शर्मा

कोलकाताच्या ईडन गार्डनच्या हिरवळीवर भारत-बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताच्या ताफत्यातील जलदगती गोलंदाजांनी बांगलादेश फलंदाजांचे कंबरडे मोडले. पहिल्या डावात बांगलादेशचा संघ अवघ्या 106 धावांत गारद झाला आहे. या ऐतिहासिक सामन्यात इशांत शर्माने गुलाबी चेंडूवर पाच बळी टिपले. गुलाबी चेंडूवर सर्वोच्च कामगिरी करणारा भारताचा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत 10 वेळा त्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवण्याचा पराक्रम करुन दाखवलाय.

पवारांनी राजकारणातील चाणक्यावर केली मात, NCPचा भाजपला टोला

कोलकाताच्या मैदानात रंगलेला सामना हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 12 वा दिवस रात्र कसोटी सामना आहे. यापूर्वी चार गोलंदाजांनी पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवण्याचा पराक्रम केला आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्यात सर्वाधिक 26 बळी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने 88 धावा खर्च करुन 5 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्याच जोश हेजलवूडच्या नावे 70 धावा खर्च करुन 6 बळी, पाकिस्तानच्या यासिर शाह 164 धावांत 6 बळी आणि न्यूझीलंडच्या ट्रेंड बोल्टने अवघ्या 32 धावांत 6 बळी अशी कामगिरी नोंदवली होती.

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर

बांगलादेश विरुद्ध भेदक मारा करणारा इशांत शर्मा आता या गोलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. इशांतने 12 षटकातील 4 षटके निर्धाव टाकत 1.8 च्या सरासरीने 22 धावा खर्च करत बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत धाडला.

५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री; तिन्ही पक्षांची सहमती: संजय राऊत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs Bangladesh Day Night Test Cricket Score First five wicket haul for Ishant Sharma in Pink ball Cricket