पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsBAN : नागपूरचं मैदान मारत भारताचा टी-२० मालिकेवर कब्जा

श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल

नागपूरच्या मैदानातील तिसऱ्या आणि अखेरचा टी-२० सामन्यात भारताने बांगलादेशला ३० धावांनी पराभूत करत मालिका २-१ अशी खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवर लिटन दास अवघ्या ९ धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर मोहमद नैमने एकाकी झुंज देत सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न  केला. पण शिवम दुबेने त्याला बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. तो ४८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ८१ धावांची झंजावत खेळी करुन बाद झाल्यानंतर मोहमद मिथनच्या २७ धावा वगळता बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. बांगलादेशचा संघ १९.२ षटकात १४४ धावांतच आटोपला.   

स्मृती-शैफालीच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिलांची विजयी आघाडी

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिखर धवन आणि रोहित शर्मा या जोडीने भारताच्या डावाला सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा २(६) आणि शिखर धवन  १९ (१६) धावा करुन परतल्यानंतर मध्यफळीतील लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला. 

IPL 2020 : लखनऊसह या नव्या शहरातील मैदानात रंगणार सामने

लोकेश राहुलने ७ चौकाराच्या मदतीने ३५ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ३३ चेंडूत ६२ धावा कुटल्या. ऋषभ पंत अवघ्या ६ धावा करुन तंबूत परतला. मनिष पांडेच्या १३ चेंडूतील नाबाद २२ धावा शिवम दुबेने ८ चेंडूत केलेल्या नाबाद ९ धावांसह भारताने निर्धारित २० षटकात ५ बाद १७४ धावा केल्या. बांगलादेशकडून सौम्य सरकार आणि शैफुअल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन तर अल अमीन हुसेनने एक गडी बाद केला.