पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsBAN: अबतक ७०, गुलाबी चेंडूवर किंग कोहलीचे शतक

विराट कोहली

बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 3 बाद १७४ धावांवरुन खेळ सुरु केला. अजिंक्य रहाणे अर्धशतक करुन माघारी फिरला. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीतील २७ वे अर्धशतक झळकावले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे ७० वे शतक आहे.  

INDvsBAN:पहिला दिवस भारतीय वेगवान गोलंदाजांचा, टीम इंडिया १७४/३

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून पहिले शतक झळकवण्याचा विक्रम लाला अमरनाथ यांच्या नावे आहे. त्यांनी १९३३-३४ मध्ये कसोटी शतक झळकावले होते. दिवस-रात्र कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. भारताकडून तो पहिला शतकवीर ठरला. एकदिवसीयमध्ये भारताकडून पहिले शतक कपिल देव यांनी नोंदवले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दिवस-रात्र सामन्यात संजय मांजरेकर यांनी शतक झळकावले होते. टी-२०त भारताकडून पहिले शतक झलकवण्याचा पराक्रम हा सुरेश रैनाने केला होता. तर दिवस-रात्र  टी-२० च्या सामन्या रोहित शर्माने पहिले शतक झळकावले आहे. 

गुलाबी चेंडूवर अर्धा संघ तंबूत धाडणारा इशांत पहिला..

कोहलीच्या शतकाशिवाय पुजारा आणि रहाणे यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दिडशेहून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघ बांगलादेश समोर किती धावांचे आव्हान देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.