पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvs BAN : ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियाचा 'विराट' विजय

भारतीय संघाचा दिमाखदार विजय

कोलकाताच्या ईडन गार्डनवर मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला १ डाव आणि ४६ धावांनी पराभूत केले. दिवस-रात्र सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशीच बांगलादेशचा खेळ खल्लास केला. दोन्ही डावात मिळून बांगलादेशचा संघ भारताने एका डावात केलेल्या ३४७ धावांपर्यंतही पोहचू शकला नाही.

तिसऱ्या दिवशी बांगलादेशने ६ बाद १५२ धावांवरुन खेळाला सुरुवात केली. पहिल्या डावात ईशांतच्या माऱ्यान घायळ झालेल्या पाहुण्या बांगलादेशला दुसऱ्या डावात उमेश यादवने धक्क्यावर धक्के दिले. दुसऱ्या डावात उमेश यादवने पाच बळी मिळवण्याचा पराक्रम करुन दाखवला. कोलकाताच्या मैदानात भारतीय जलदगती गोलंदाजांनी संघाला एकतर्फी आणि मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली.

गुलाबी चेंडूवर अर्धा संघ तंबूत धाडणारा इशांत पहिला..

कोलकाताच्या ईडन गार्डनच्या मैदानात रंगलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात भारताने पाहुण्या बांगलादेशला १०६ धावांत आटोपले. त्यानंतर विराट कोहलीचे शतक आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ९ बाद ३४७ धावांवर आपला डाव घोषीत केला. त्यावेळी भारताकडे २४१ धावांची आघाडी होती. बांगलादेशचा दुसरा डाव १९५ धावातच आटोपत भारताने ऐतिहासिक कसोटी सामन्यातील दिमाखदार विजयावर शिक्कामोर्तब केले.