पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs BAN : गब्बर-हिटमॅन जोडी मैदानात उतरताच 'शतक' ठोकणार

रोहित शर्मा आणि शिखर धवन

India vs Bangladesh, 2nd T20I at Rajkot: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-२० सामना राजकोटच्या मैदानात रंगणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड करत भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात संपूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरेल. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अनेक विक्रम झाल्याचे पाहायला मिळू शकतात. नजर टाकूयात कोणत्या खेळाडूला कोणता विक्रम करण्याची संधू खुणावत आहे यावर... 

कोहलीसोबत खेळलेल्या क्रिकेटर्संना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक

*भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरताच एक विक्रम आपल्या नावे करेल. आतापर्यंत रोहितने ९९ आंतरराष्ट्री टी-२० सामने खेळले आहेत. त्याचा हा शंभरावा टी-२० सामना असणार आहे.  
* मध्यफळीतील युवा फलंदाज श्रेयस अय्यरला देखील एक विक्रम खुणावत आहे. या सामन्यात १० धावा करताच २०१९ मध्ये टी-२० सामन्यात हजार धावांचा टप्पा पार करण्याचा पराक्रम त्याच्या नावे होईल. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरेल. इतर संघाच्या तुलनेत तो १४ फलंदाज असेल.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो याचा अजूनही विश्वास बसत नाही : राणी

* दुसऱ्या टी-२० सामन्यात संघ व्यवस्थापन ऋषभ पंतवर विश्वास दाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तो मैदानात उतरला तर यष्टिमागे ५० झेल टिपण्याचा टप्पा तो पूर्ण करेल.  
* भारतीय सलामीवीर शिखर धवनचाही हा १०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. याशिवाय फिरकीपटू वाशिंग्टन सुंदरला या सामन्यात संधी मिळाली तर तो ५० वा टी-२० सामना खेळेल.  
* बांगलादेशच्या मोसादीक हुसेन याला टी-२० मध्ये हजारीचा टप्पा पार करण्यासाठी ५३ धावांची आवश्यकता आहे. तर झटपट क्रिकेटच्या मैदानात ५० षटकार खेचण्यासापासून बांगलादेश कर्णधार महमदुल्ला २ पावले दूर आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs Bangladesh 2nd T20I statistical preview know about rohit sharma shikhar dhavn and all records who can break at rajkot