पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsBAN: रोहितच्या खेळीसह सामन्यातील पाच टर्निंग पॉइंट

मोक्याच्या क्षणी केलेल्या चुका सावरल्या

राजकोटच्या मैदानात भारतीय संघाने विजय साजरा करत दिल्लीतील पराभवाचा वचपा काढला. बांगलादेश विरुद्धच्या या विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. सामन्यात रोहित शर्माच्या तुफान फटकेबाजीने पाहुण्या गोलंदाजांचे खांदे पाडले. याशिवायही काही महत्त्वाचे फॅक्टर आहेत ज्यामुळे बांगलादेशला आघाडीवर असलेल्या शेर ए बंगाल बॅकफूटवर ढकलला गेला. नजर टाकूयात अशाच सामन्यातील कलाटणी देणाऱ्या गोष्टींवर....

बांगलादेशची सलामी जोडी फोडण्यातील यश
बांगलादेशच्या लिटन दास आणि मोहम्मद नैमने या सलामी जोडीने फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ही जोडी सेट होत आहे असे वाटत असताना  पहिल्या सामन्यात रिव्ह्यू सिस्टीमचा अभ्यास कच्चा असल्याचे टोमणे सहन कराव्या लागलेल्या पंतने यष्टीमागे चपळाई दाखवत ही जोडी फोडली. लिटन दासला त्याने अप्रतिमरित्या धावबाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. दास लयीत दिसत होता. तो  भारतासाठी डोकेदुखी ठरु शकला असता. 

वाशिंग्टन आणि चहलची फिरकीचे योगदानही महत्त्वाचे
पहिल्या विकेटसाठी ६० धावांची खेळी झाल्यानंतर सेट झालेल्या नैमला वाशिंग्टनने माघारी धाडत बांगलादेशला मोठा धक्का दिला. त्यानंतर मागील सामन्यात धोकादयक ठरलेल्या मुशफकीर रहिम आणि सौम्य सरकारला चहलने माघारी धाडले. उल्लेखनिय आहे दिल्लीच्या सामन्यात भारताच्या फिरकीत ही कमाल दिसली नव्हती. 

INDvBAN: वादळ घोंगावलं, पण रोहितचं! भारताची मालिकेत बरोबरी

भारतीय गोलंदाजांची एकंदरीत कामगिरी  
खलील अहमदने आपल्या ४ षटकांत ११ च्या सरासरीने ४४ धावा दिल्या. मात्र इतर गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. कर्णधार रोहित शर्माने योग्यवेळी गोलंदाजीत परिवर्तन करत बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर अवघ्या १५३ धावा केल्याने बांगलादेशच्या संघावरील दबाव वाढला.  

सलामवीरांनी बांगलादेशी गोलंदाजांचे पाडलेले खांदे
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या फटकेबाजीनंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच खांदे पाडले. त्यांनी विकेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. रोहित शर्मा खेळत असताना त्यांनी सामनाच सोडून दिला.  

INDvsBAN : बांगलादेशला रोहितच्या वादळी खेळीचा तडाखा

झालेल्या चुकांमध्ये तात्काळ सुधारणा
बांगलादेशच्या संघाच्या धावफलकावर अवघ्या ४३ धावा असताना पंतने अतिउत्साहात स्टंपिंगची संधी दवडली. पण त्याने ही चूक सावरत लिटन दासला माघारी धाडले. यापूर्वी वाशिंग्टनच्या षटकात रोहितनेही त्याचा झेल सोडला होता. ही चूक तात्काळ सुधारल्याने भारताला फायदा झाला.