पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहितच्या नेतृत्वाखाली यांना मिळेल कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी

रोहित शर्मा

India vs Bangladesh, 1st T20I: मायदेशात बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये पहिला सामना खळवण्यात येणार आहे. विराट कोहलीला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. विराटशिवाय हार्दिक पांड्या, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि नवदीप सैनी या खेळाडूंचा देखील संघात समावेश नाही. 

वॉर्नर-स्मिथ जोडीसमोर लंकेचा खेळ खल्लास!

बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी शिवम दुबेला संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय संजू सॅमसन पुनरागमन करणार आहे. या दोघांना स्थानिक सामन्यातील दमदार कामगिरीच्या जोरावर संधी मिळाली आहे. या संधीचं सोन करणार का? ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

रोहित-धवन सलामीवीर
अनुभवी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर भारताचा डावाला सुरुवात करण्याची जबाबदारी असेल. दोघही चांगली लयीत असून बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर ही जोडी मोठी डोकेदुखी ठरु शकते. 

मध्यफळीची मदार राहुल, श्रेयस आणि पंत 
विराटच्या अनुपस्थितीत केएल राहुलला टीम इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. कसोटी संघातून जागा गमावल्यानंतर विजय हजारे चषकात त्याने दमदार कामगिरी करुन भारताच्या टी-२० संघात स्थान मिळवले आहे. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर कायम राहू शकतो. याशिवाय ऋषभ पंतवर देखील नजरा असतील. पंतला संजू सॅमनच्या रुपात एक तगडे आव्हान असेल.   

IND vs BAN : ...म्हणून सामन्यांच्या तिकिटांची किंमत सर्वांत कमी
 
अष्टपैलू क्रुणाल पांड्या, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर
अष्टपैलूच्या रुपात क्रुणाल पांड्यासह शिवम दुबे यांना संधी मिळू शकते. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत क्रणालवर मोठी जबाबदारी असेल. तर शिवम दुबे संधीचं सोन करण्यासाठी प्रयत्नशील दिसेल. रोहित शर्मासाठी तो गोलंदाजीसाठी एक उत्तम पर्याय देखील ठरेल. या दोघांशिवाय वाशिंग्टनकडेही आपल्यातील क्षमता दाखवण्याची संधी आहे. 

गोलंदाजी- दीपक चाहर, खलील अहमद, युजवेंद्र चहल 
विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघाबाहेर असलेल्या युजवेंद्र चहलला बांगलादेशविरुद्ध इलेव्हनमध्ये मुख्य भुमिका बजावताना दिसणार आहे. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत दीपक चाहर आणि दुसऱ्या बाजून खलील अहमद यांच्यावर गोलंदाजीची धूरा असेल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india vs bangladesh 2019 india predicted playing xi for the 1st t20 at delhi arun jaitley stadium