पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsBAN : पहिल्या कसोटीपासूनच टिम इंडिया मांडणार नवा 'डाव'

भारतीय संघ

India vs Bangladesh, 1st Test Match at Indore: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवार पासून सुरुवात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ गुलाबी चेंडूवर सरावाला प्राधान्य देणार आहे. २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान कोलकाताच्या मैदानात रंगणाऱ्या ऐतिहासिक डे नाइट सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ गुलाबी चेंडूवर सराव करणार असल्याचे वृत्त आहे.  

नेट प्रॅक्टिसपूर्वी कोहलीची गल्लीत फटकेबाजी

यासाठी कर्णधार विराट कोहलीसह भारतीय संघाने मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडे गुलाबी चेंडूवर सराव करण्यासंदर्भात सोय करण्याची मागणी केली आहे. एसपीसीएचे सचिव मिलिंद कानमाडिकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खेळाडूंना याबाबत सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.  

विक्रमी कामगिरीसह चाहरची क्रमवारीत गरुड झेप!

मिलिंद म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघाने रात्रीच्या वेळेस गुलाबी चेंडूवर सराव करण्यासंदर्भात विचारणा केली आहे. बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीची ही तयारी असेल. आम्ही त्यांना यासाठी सहकार्य करणार आहोत. गुलाबी चेंडूवर खेळण्यापूर्वी सराव करणे आवश्य असल्याचे अजिंक्य रहाणे याने म्हटले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: India vs Bangladesh 1st test Virat Kohli and team india to Train Under Lights in Indore for Day Night Test