पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsBAN: मयांकच्या द्विशतकासह टीम इंडियाच्या नावे अनोखा विक्रम

मयांक अग्रवाल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील खेळाची पुनरावृत्ती करत बांगलादेशविरुध्द मयांकने आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकावले. तैजुल इस्लामच्या गोलंदाजीमध्ये चौकाराने दीडशतक पूर्ण केलेल्या मयांकने मेंहदी हसनच्या षटकात षटकार खेचत दिमाखात द्विशतक झळकावले. विरेंद्र सेहवाग (६) आणि सुनील गावसकर (३) यांच्यानंतर सर्वाधिक द्विशतके करणारा मयांका तिसरा भारतीय सलामीवीर ठरला.

'घाबरु नका शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी, नुकसान भरपाई लवकर मिळेल'

या द्विशतकी खेळीसह मयांकने माजी कसोटीपटू विनोद कांबळी, व्ही.व्ही.एस लक्ष्मण,डीएन सरदेसाई, वासिम जाफर आणि विनू मंकड या दिग्गजांच्या पक्तिंत स्थान मिळवले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकवणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत किंग कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीने ८३ सामन्यातील १४० डावात सात द्विशतके झळकावली आहेत. त्यापाठोपाठ सेहवाग, सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी सहा-सहा द्विशतके झळकावली आहेत. राहुल द्रविडच्या खात्यात ५ तर सुनील गावसकर यांच्या नावे 4 द्विशकांची नोंद आहे. सध्याच्या घडीला मध्यफळीत भारताची मदार सांभाळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने तीनवेळा द्विशतकी खेळी साकारली आहे.

चिदंबरम यांना पुन्हा झटका, जामीन अर्ज फेटाळला

मयांकच्या या खेळीनं आणखी एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. एखाद्या संघाकडून सातत्यपूर्ण द्विशतक करण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावे झाला आहे. भारतीय संघाकडून हे चौथे द्विशतक असून यात मयांकच्या दोन द्विशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात मयांकने २१५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर पुण्याच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद २५४ धावांची खेळी साकारली होती. रांचीच्या मैदानात सलामीवीर रोहितचा डबल धमाका पाहायला मिळाला. त्याने २१२ धावांची खेळी केली.  आता बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मयांकने पुन्हा आणखी एक द्विशतक झळकावले. भारतीय फलंदाजांनी द्विशतक केलेला सामना भारतानेच जिंकला आहे. त्यामुळे हा सामनाही भारताच्या बाजूने कलला आहे. 

'तीन अंकी नाटकाच्या खेळात आम्हीच यशस्वी होणार'