पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsBAN: मयांकची शतकी खेळी अन् खास योगायोग!

मयंक अग्रवाल

भारतीय संघाचा सलामीवीर मयांक अग्रवालने इंदूरच्या मैदानात मिळालेल्या जीवनदानानंतर मनमुराद खेळी करत शतक साजरे केले. त्याने कसोटी कारकिर्दीतील आपल्या तिसऱ्या शतकाला गवसणी घातली. इमरुल कायेस याने अबू जायदच्या गोलंदाजीवर ३१ धावांवर पहिल्या स्लिपमध्ये मयंकचा झेल सोडला होता. हा झेल सोडल्याची बांगलादेशच्या संघाला चांगलीच किंमत मोजावी लागली. १८३ चेंडूत शतक पूर्ण केले. इबादत हुसैनच्या चेंडूवर दोन धावा घेत त्याने शतकाला गवसणी घातली.  

क्रिकेट खेळत नाही पण त्याचे नियोजन करतो, शरद पवारांचे उत्तर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विशाखापट्टणमच्या मैदानात मयांकने द्विशतकी खेळी साकारली होती. या सामन्यातील २१५ धावा ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुण्यातील कसोटी सामन्यात त्याने १०८ धावांची खेळी केली होती. शतकाशिवाय त्याच्या खात्यात ३ अर्धशतके जमा आहेत. यातील दोन अर्धशतके ही ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील असून एक अर्धशतक हे विडींजविरुद्ध त्यांच्या कॅरेबियन भूमीवरील आहे. घरच्या मैदानातील प्रत्येक अर्धशतकाला शतकात रुपातरित करण्यात मयंक यशस्वी ठरला आहे.

'मोदी, शहांना समजण्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील'

मयांकच्या आजच्या शतकाला खास महत्त्व आहे. आजच्याच दिवशी ५० वर्षांपूर्वी भारताचे दिग्गज सलामीवीर गुंडप्पा विश्वनाथ यांनी पदार्पणात शतकी खेळी करण्याचा पराक्रम केला होता. हे दोन्ही फलंदाज कर्नाटकचे आहेत. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी फिरल्यानंतर मयंकने पुजाराच्या साथीने भारताचा डाव सावरला. पुजारा अर्धशतकी खेळी करुन माघारी फिरल्यानंतर विराट कोहली शून्यावर बाद झाला. त्यानंतर एका बाजूने तग धरुन संयमी खेळी करणाऱ्या मयंकने उपकर्णधार रहाणेसोबतही जम बसवला.

नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करा: शरद पवार