पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvs BAN: टीम इंडियाच्या पराभवामागची पाच कारणं

बांगलादेशने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली विजय पथावर स्वार असलेल्या भारतीय संघाला रोहितच्या नेतृत्वाखाली ब्रेक लागला. प्रदूषणाची चर्चा सुरु असताना दिल्लीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारताचा विक्रम दूषित झाला आहे. बांगलादेशने पहिल्यांदाच टी-२० सामन्यात भारताला पराभूत केले आहे. सलामीच्या सामन्यातील काही चुकांमुळे भारतीय संघ पिछाडीवर पडला. नजर टाकूयात त्या पाच प्रमुख चुकांवर ज्यामुळे भारताला सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 

सलामी जोडीचं अपयश
गेल्या काही दिवसांपासून भारतीय सलामीची जोडी कमालीचा खेळ करत आहे. बांगलादेशच्या गोलंदाजांनी रोहित शर्माला लवकर तंबूत धाडण्यात यश मिळवल्याने भारतावरील दबाव वाढला. शफिऊलने रोहितला माघारी धाडत बांगलादेशला चांगली सुरुवात करुन दिली. 

शिखर धवनची विकेट 
रोहित शर्मा माघारी फिरल्यानंतर अनुभवी शिखर धवनने नवख्या शिलेदारांसह भारताची धावसंख्या हलवती ठेवली. मात्र पंत आणि त्याच्यातील ताळमेळ ढळला. धवन ४१ धावांवर माघारी फिरला. बांगलादेशसाठी ही मोठी विकेट ठरली. धवन थांबला असता तर सामन्याचा निकाल थोडा वेगळा दिसला असता. 

गोलंदाजांना जोडी फोडण्यात आलेलं अपयश
चाहरने सलामीवीर लिटन दासला माघारी धाडत बांगलादेशला बॅकफूटवर आणले. मात्र त्यानंतर मोहम्मद नैम आणि सौम्य सरकार यांनी ४६ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. ही जोडी फोडण्यात भारतीय गोलंदांनी अधिक वेळ घेतला. या भागीदारीने भारताच्या पराभवाचा पाया रचला. नैमला बाद करत चहलने पारडे थोडे भारताच्या बाजूने झुकवले मात्र दुसऱ्या बाजूला सौम्य सरकारने रहिमसोबत ६० धावांची भागीदारी रचली. 

क्रुणाल पांड्याकडून झेल सुटला तिथंच मॅच गेली
 सामनात चुरस निर्माण झाली असताना चहल घेऊन आलेल्या बांगलादेशच्या डावातील १८ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मुशफिकर रहिमचा क्रुणाल पांड्याने सीमारेषेवर झेल सोडला. हा झेल टिपला असता तर सामन्याचे चित्र बदलले असते. रहिमने ६० धावांची नाबाद खेळी करत बांगलादेशचा विजयात सिंहाचा वाटा उचलला. 

रिव्ह्यूसह गचाळ क्षेत्ररक्षण

रिव्ह्यूच्या चुकीच्या निर्णयासह क्षेत्ररक्षणातील चुका भारताच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. मोक्याच्या क्षणी चलाकी दाखवून बांगलादेशच्या फलंदाजांना धावबाद करण्याची संधी भारताने गमावली. याचा बांगलेदेशला फायदा झाला.   

 


 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs Bangladesh 1st T20I five reason behind team india loss the match again Bangladesh