पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहितच्या संघात पंतला संधी मिळणार की संजू सॅमसनला?

रोहित शर्मा आणि ऋषभ पंत

India vs Bangladesh, 1st T20I at Delhi Arun Jaitley Stadium:  दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात असताना भारत-बांगलादेशचा संघ शहरातील अरुण जेटली स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना खेळण्यास सज्ज आहे. बिकट परिस्थितीत दोन्ही संघांनी खेळण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र प्रदूषणामुळे निर्धारित षटकांचा सामना पूर्ण खेळवला जाणार का हे निश्चितपणे सांगता येणे कठिण आहे.  
रोहितच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱ्या संघात युवा खेळाडूंना अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला संजू सॅमसन पंतसमोर मोठे आव्हान उभा करत आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यात या दोघांपैकी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 

पहिल्या दिवस-रात्र कसोटीचे पेस-गोपीचंद-सानियाला निमंत्रण

पिच रिपोर्ट 
दिल्लीच्या मैदानातील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यापूर्वी खेळपट्टीवर हलके गवत पाहायला मिळाले होते. सामन्यात खेळपट्टी कसा रंग दाखवणार आणि कोण त्याचा फायदा उठवणार हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे, 

हवामान
पावसाचे कोणतेही चित्र नसले तरी प्रदूषणामुळे हवेचा दर्जा खालावला आहे. प्रदूषणाने उच्चत्तम पातळी गाठल्यामुळे शहरातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. बांगलादेशी खेळाडू सरावादरम्यान मास्क बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंसमोर प्रदूषण ही मोठी समस्या असणार आहे.   

ऐतिहासिक कसोटीसाठी PM मोदींसह सचिनही उपस्थित राहणार?

भारत-बांगलादेश यांच्यातील रेकॉर्ड 
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत ८ लढती झाल्या आहेत. यापैकी सर्वच्या सर्व सामन्यात भारताने मैदान मारले आहे.  भारतीय संघाच्या मागील ६ टी-२० सामन्यांचा विचार केल्यास या सर्व सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताला केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ  फलंदाजी केली. दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या मैदानात भारत-न्यूझीलंड यांच्यात सामना झाला होता. यात भारताने विजय मिळवला होता.

भारताचा संभाव्य संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, क्रुणाल पांड्या, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, खलील अहमद, दीपक चाहर, युजवेंद्र चहल.

बांगलादेश संभाव्य संघ :
महमुदुल्लाह (कर्णधार), लिटन दास, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, मोसद्दक हुसैन, अनिमुल इस्लाम, तैजुल इस्लाम, मुस्ताफिजुर रहमान, शैफुल इस्लाम, आफिफ हुसैन.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs Bangladesh 1st T20I Dream11 ind vs ban predicted Playing XI Pitch Report delhi air pollution weather forecast team update head to head stats at arun jaitley stadium