भारत आणि बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक सामन्यासाठी कोलकाता शहर गुलाबी-गुलाबी झाले आहे. २२ नोव्हेंबरला ईडन गार्डनच्या मैदानात भारतीय संघासह बांगलादेश पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हे देखील उत्साही आहेत. कोलकातामधील आगामी कसोटी सामना अविस्मरणीय व्हावा यासाठी खुद्द सौरव गांगुली मेहनत घेत आहेत.
आतापर्यंत झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यांवर एक नजर..
गांगुली यांनी ईडन गार्डनच्या मैदानातील तयारीचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सामन्याच्या पहिल्या चार दिवसांची तिकीट विक्री ही फार पूर्वीच झाली असल्याचे गांगुली यावेळी म्हणाले. त्यांनी खेळपट्टी चांगली असल्याचे गांगुलींनी सांगितले. आतापर्यंत कोणत्या कसोटी सामन्यात चार दिवसांची सामन्यापूर्वी विक्री झाल्याचे आठवत नसल्याचे सांगत क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचल्याचेही गांगुली यांनी म्हटले आहे.
अनुष्कानंतर आता विराटचाही होणार सन्मान
ऐतिहासिक कसोटी सामन्यात आपल्याला खूप काही पाहायला मिळेल. सामन्याच्या पहिल्या दिवशी अनेक माजी क्रिकेटर, सेलेब्रिटी आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, कपिल देव, राहुल द्रविड, अनिल कुंबले हे दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहितीही गांगुली यांनी दिली. टी-ब्रेकमध्ये हे माजी कर्णधार मैदानात एक फेरी मारतील, असेही गांगुली यांनी सांगितले.