मेलबर्नच्या मैदानात महिला दिनाच्या दिवशी ऑस्ट्रलियन महिलांनी भारतीय महिलांचा स्वप्न भंग करत पाचव्यांदा विश्वचषक जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिलांनी सलामी फलंदाज बेथ मूनीच्या नाबाद ७८ धावा आणि एलिसा हेलीच्या झंजावत ७५ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात ४ बाद १८४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिलांची तारांबळ उडाली.
INDvsAUS Final : सर्व अपडेट्स एका क्लिकवर
विश्वचषक स्पर्धेत आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेणारी शेफाली वर्मा (२) स्फोटक फलंदाज स्मृती मानधना ११ हरमनप्रीत कौर ४ यांचा फ्लोप शो अंतिम सामन्यातही कायम राहिला. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक ३३ धावा केल्या. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आघाडी फलंदाजीच्या फ्लोप शोमुळे भारताला शंभरीही पार करता आली नाही. ऑस्ट्रेलियाने भारतीय महिलांना १९.१ षटकात ९९ धावांवर गारद करत पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एलिसा हिलीने चौकार मारत सामन्याला सुरुवात केली. दीप्तीच्या पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियन महिलांनी १४ धावा कुटल्या. शेफाली वर्माने हिलीचा झेल सोडून तिला जीवनदान दिले. हिली त्यावेळी फक्त ९ धावांवर खेळत होती. हे जीवनदान भारताला चांगलेच महागात पडले. हिलीने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. राधा यादवने ७५ धावांवर एलिसाला तंबूत धाडले. ती माघारी फिरल्यानंतरम बेथ मूनीनेही आपले अर्धशतक पूर्ण करत नाबाद ७८ धांवाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४ बाद १८४ पर्यंत नेऊन पोहचवली.
सेहवागचा धमाका, लाराच्या संघावर सचिनचा संघ पडला भारी!
ऑस्ट्रेलियन महिलांनी दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. धडाकेबाज सलामीवीर शेफाली वर्माला स्कॉटने पहिल्या षटकातील तिसर्याच चेंडूवर २ धावांवर बाद केले. भारताला हा मोठा धक्का होता. स्मृती मानधनाला साथ देण्यासाठी यष्टिरक्षक तानिया भाटिया मैदानावर आली. मात्र, अवघे ४ चेंडू खेळल्यानंतर तिच्या हेल्मेटवर चेंडू आदळल्याने तिला मैदान सोडावे लागले. जेमिमा रॉड्रिग्जला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर ११ धावांवर असताना स्मृतीला मोलिनक्सचा चेंडू हवेत मारण्याचा मोह आवरला नाही आणि ती कॅरीकडेच झेल देऊन परतली. धावफलकावर अवघ्या १८ धावा असताना ३ विकेट्स गमावल्या होत्या. कर्णधार हरमनप्रीत अवघ्या चार धावा करुन परतली. दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमुर्तीने पाचव्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी रचून भारताचे अर्धशतक धावफलकावर लावले, पण १९ धावा करून वेदाने दीप्तीची साथ सोडली. दीप्ती शर्माने ३५ चेंडूत सर्वोच्च ३३ धावांची खेळी केली. रिचा घोषने १८ धावांची खेळ करत भारताला ९९ धावांपर्यंत मजल मारता आली.