पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लाजिरवाण्या पराभवानंतर रावळपिंडी एक्स्प्रेसचा विराट ब्रिगेडला सल्ला

शोएब अख्तर

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने टीम इंडियाला सल्ला दिलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सलामीच्या सामन्यात विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर आहे. दोन्ही संघामध्ये संघर्षमय लढत होईल, अशी आशा होती. मात्र ऑस्ट्रेलियाने हा सामना एकहाती जिंकत सर्व अंदाज फोल ठरवले. 

INDvsAUS: कांगारुंची जबराट सलामी, दहा जणांनी केलेल्या धावा दोघांनीच कुटल्या

मुंबईच्या वानखेडेवर ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला ज्यापद्धतीने पराभूत केले ते हैराण करुन सोडणारे होते, असे अख्तरने म्हटले आहे. भारताने या सामन्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. ऑस्ट्रेलियान फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना निभाव लागू दिला नाही. दुसऱ्या सामन्यात जर ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली तर हेच चित्र पाहायला मिळू शकते, असेही अख्तरने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणाऱ्या भारतीय संघात आत्मविश्वासाचा अभाव दिसला. 

सामन्यानंतर विराट म्हणाला मी चुकलो!

विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर येण्याऐवजी चौथ्या क्रमांकावर येणे हा चुकीचा निर्णय होता. तो २८ व्या षटकात मैदानात उतरला. त्याला नेहमीच्या स्थानावरच खेळावे लागेल, असा सल्ला अख्तरने दिला आहे. मालिकेत बरोबरी साधण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे. जर ऑस्ट्रेलियाने त्यांना ३-० असे पराभूत केले तर ते खूप लाजिरवाणे ठरेल, असेही त्याने म्हटले आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs australia odi series ind vs aus 1st odi shoaib akhtar on india defeat and virat kohli s batting order