पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsAUS: या तीन कारणामुळे कांगारुंची शिकार शक्य झाली!

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बंगळुरुमधील सामन्यातील एक क्षण

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाने दिमाखदार कमबॅक करत उर्वरित दोन सामने जिंकत मालिका खिशात घातली. न्यूझीलंडविरुद्धच्या मोठ्या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा हा मालिका विजय आत्मविश्वास द्विगुणित करणारा असाच आहे. रविवारी बंगळुरुच्या मैदानात भारतीय संघाने एक नंबरी खेळ दाखवत कांगारुंची शिकार केली. रोहित-कोहली जोडी फलंदाजी करत असताना पाहुण्या संघाच्या ताफ्यातील गोलंदाजांना चेंडू नेमका कुठे टाकावा, हे समजत नव्हते.  

स्मिथ भारी खेळला, पण 'विराट' स्मित हास्य लाभलं कोहलीलाच!

ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात नाणेफेक जिंकून मालिकेत नाफेफेक जिंकण्याची हॅटट्रिक केली. पण संघातील खेळाडूंनी अखेरच्या दोन्ही सामन्यात कर्णधाराने नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय फोल ठरवला. अखेरच्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि लाबूशेन यांची चिवट खेळी सोडली तर अन्य दिग्गजांना नावाला साजेसा खेळ करता आला नाही. परिणामी न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाने सन्मानजनक विजय नोंदवला. जाणून घेऊयात पहिल्या सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघाने अखेरच्या सामन्यातील विजयासह मालिका जिंकण्यामागची प्रमुख कारणे 
वॉर्नर आणि फिंच
ऑस्ट्रेलियन सलामीवीरांचा फ्लॉप शो
मुंबईच्या सलामीच्या सामन्यात शतकी नाबाद शतकी खेळीसह संघाला विजयी सलामी देणारी डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरॉन फिंच जोडी अखेरच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरली. शमीने वॉर्नरला अवघ्या ३ धावांवर माघारी धाडल. दुसरीकडे फिंचनं धावबादच्या रुपात आपली विकेट फेकली. सलामीवीर स्वस्तात माघारी फिरल्यानंतर भारतीय गोलंदाज पाहुण्या ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ठेवण्यात यशस्वी ठरले. 

INDvsAUS: कांगारुंचा वचपा काढला, बंगळुरुमध्ये रोहित-विराट हिट शो!
रोहित शर्मा
रोहित शर्माची फटकेबाजी!
शिखर धवन क्षेत्ररक्षणावेळी दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होण्याची भीती निर्माण झाली होती. त्याच्याऐवजी अखेरच्या सामन्यात रोहितसोबत लोकेश राहुलने भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. लोकेश राहुल थोडक्या धावा करुन माघारी फिरला. पण रोहितने आपला रिदम कायम ठेवला. त्याने आपला स्वाभाविक खेळ करत ऑस्ट्रेलियाविरुद्धचं नातं हे फटकेबाजीचं असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. त्याच्या शतकी खेळीनं टीम इंडियाला शिखर धवनची अनुपस्थिती जाणवली नाही. रोहितच्या शतकी खेळीनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे खांदे पडले अन् भारताच्या विजयाची वाट सुकर झाली.

रोहितच्या फटकेबाजीनं अख्तरला आठवली सचिनने दिलेली वेदनादायी जखम
विराट आणि रोहित
विराट-रोहित दुसऱ्या विकेटची भागीदारी!
ऑस्ट्रेलियन संघाने रोजकोटच्या मैदानात तुफानी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला माघारी धाडत निर्णायक सामन्यात संघर्षमय लढत दिसेल, असे संकेत दिले. मात्र विराट-रोहित जोडी फोडण्यात त्यांना यश आले नाही. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा आत्मविश्वास ढळून पडला. रोहित ११९ आणि विराट ८९ धावांव बाद झाले. मात्र तोपर्यंत सामना भारताच्या पारड्यात आला होता. श्रेयस अय्यर आणि मनिष पांडेनं या युवांनी भारतीय संघाच्या विजयावर मोहर उमटवली. या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. यात त्यांना ५ टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मोठी मालिका खेळायची आहे. उसळत्या खेळपट्टीवर संघर्ष करण्याचे बळ देण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयाने निश्चितच बळ मिळेल.