पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsAUS: चाहत्यांचा जीव टांगणीवर असताना कोहलीचे ७१ वे शतक लांबणीवर

विराट कोहली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांचा वेगाने पाठलाग करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीच्या आणखी एका शतकाची संधी हुकली. एकदिवसीय कारकिर्दीतील ५६ व्या अर्धशतकाला कोहली ७१ शतकामध्ये रुपांतरित करेल असे वाटत असताना झम्पाने आपल्या अखेरच्या षटकात कोहलीला बाद केले. झम्पाच्या चेंडूवर कोहलीने उत्तुंग फटका मारल्यानंतर अ‍ॅश्टॉन अगरने सीमारेषवर सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवून दिला. स्टार्कने त्याच्या मेहनतीवर चार चाँद लावले. 

INDvsAUS  दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील अपडेट्स एका क्लिकवर

भारताच्या डावातील ४४ व्या आणि झम्पाच्या अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर कोहली बाद झाला. त्याने टोलवलेला उत्तुंग फटका अ‍ॅश्टॉन अगरने अप्रतिमरित्या रोखला. आपले संतुलन बिघडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने चेंडू स्टार्कच्या दिशने फेकला. या दोघांच्यातील सुरेख ताळमेळानं झप्मा  पाचव्यांदा कोहलीला बाद करण्यात यशस्वी ठरला.

धवन पाचव्यांदा झाला 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

कोहलीचे शतक लांबणीवर पडले असले तरी या सामन्याती ७८ धावांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने चांगली धावसंख्या उभारली आहे. कोहलीने या सामन्यात अवघ्या २५ डावात १ हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याचा पराक्रम आपल्या नावे केला. त्याच्यासह शिखर धवनसह तो अव्वलस्थानी आहे.  नवज्योत सिद्धू यांनी देखील २५ डावांत एकदिवसीय सामन्यात हजारी करण्याचा पराक्रम केला. होता. लोकेश राहुल २७ डाव तर महेंद्रसिंह धोनीने २९ डावात एकदिवसीयमध्ये हजारी नोंदवली आहे.  

SAvENG: मैदानातील आक्रमकपणा नडला! रबाडावर बंदीची कारवाई

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला एकहाती पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढून मालिकेत बरोबरी करण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. फलंदाजांनी आपले काम केले आहे. आता मालिकेत बरोबरी साधण्याची जबाबदारी ही गोलंदाजांच्या खांद्यावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या तगड्या फलंदाजांसमोर ते कशी कामगिरी करतात यावर भारतीय संघाच्या विजयाचे गणित अवलंबून असेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India vs Australia 2nd ODI Zampa final over Once Again takes virat kohali wicket Starc and Agar good effort on boundary line