पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धवन पाचव्यांदा झाला 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

शिखर धवन

राजकोटच्या मैदानातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीरांनी  टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली. पण रोहित शर्माला अर्धशतकाने तर धवनला शतकाने हुलकावणी दिल्याचे पाहायला मिळाले. नव्वदीच्या घरात येऊन तंबूत परण्याची शिखर धवनची ही पाचवी वेळ आहे.  शतकाला अवघ्या चार धावा कमी असताना रिचर्डसनने त्याला स्टार्ककरवी झेलबाद केले. धवनने ९० चेंडूत १३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. 

SAvENG: मैदानातील आक्रमकपणा नडला! रबाडावर बंदीची कारवाई

शिखर धवनने १३५ सामन्यातील १३३ डावात १७ शतके आणि २९ अर्धशतकाच्या जोरावर ५ हजार ६८८ धावा केल्या आहेत. यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात १२ फलंदाज पाचवेळा नव्हस नाइंटीचा शिकार झाले आहेत. या यादीत आता शिखर धवनचे नावही सामील झाले आहे. नव्वदीच्या घरात सर्वाधिक बाद होण्याचा नकोसा विक्रम हा विक्रमादित्य सचिनच्या नावे आहे. तो एकदिवसीय सामन्यात तब्बल १८ वेळा नर्व्हस नाइंटीचा शिकार झाला आहे. केन विल्यम्सन आणि अझरुद्दीन प्रत्येकी ७-७ वेळा नव्वदीच्या घरात बाद झाले आहेत. तब्बल १३ फलंदाज सहावेळा नव्वदीच्या घरात बाद झाल्याची नोंद आहे.  पाचवेळा नर्व्हस नाइंटीमध्ये बाद होणारा शिखर धवन हा १३ वा फलंदाज ठरला आहे.

INDvAUS: ऋषभ पंत ऐवजी 'या' विकेटकीपरची टीम इंडियात निवड

मुंबईतील सलामीच्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी साकारली होती. राजकोटच्या मैदानावर पूर्वीपेक्षा अधिक चांगला खेळ दाखवत तीन सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने रोहितच्या साथीनं टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहित शर्मासोबत ८१ धावांची भागीदारी केल्यानंतर त्याने कर्णधार विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी साकारली. तो लयीत दिसत असताना रिचर्डसनने त्याला बाद केले.