पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपली शंभरी झाल्यावर कुलदीपनं स्मिथला 'नर्व्हस' करत सामना फिरवला

कुलदीप यादव

भारतीय संघाचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात शंभर बळी मिळवण्याचा पराक्रम आपल्या नावे केला. राजकोटच्या मैदानात कुलदीप यादव सुरुवातीला थोडा महागडाच ठरला.  पण मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स केरीला बाद करत कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शंभर बळी मिळवण्याचा टप्पा पार केला. स्वत: शंभरी साजरी केल्यानंतर स्टीव्ह स्मिथला ९८ धावांवर बाद करत त्याने सामना भारताच्या बाजूने फिरवला.   या दोन विकेट्सनी भारताच्या मालिकेतील जिंवत राहण्याचे दरवाजेच त्याने उघडले. बाकीचं मिशन इतर गोलंदाजांनी पूर्ण केले.    

INDvsAUS: हिशोब चुकता करत टीम इंडियाची मालिकेत बरोबरी

कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज आहे. क्रिकेट जगतात सर्वाधिक जलद १०० विकेट्स टिपणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत कुलदीप तिसऱ्या स्थानावर आहे.   ५८ डावात त्यांच्या नावे आता १०१ बळी झाले आहेत. सर्वाधिक कमी डावात शंभर बळी मिळवण्याचा विक्रम हा अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानच्या नावे आहे. राशिद खानने अवघ्या ४४ डावात  १०० बळी मिळवण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्यापाठोपाठ पाकच्या शकलेन मुश्ताकचे नाव येते. त्याने ५३ डावात १०० बळी टिपले होते. दक्षिण आफ्रिकेचा इमरान ताहिर आणि कुलदीप यादव संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. शेन वॉर्नला शभर बळी मिळवण्यासाठी ६० वेळा मैदानात उतरावे लागले होते. तर अजंता मेंडीसने ६३ डावात हा टप्पा पार केला होता.  

अनोखा विश्वविक्रम नावे असलेले माजी क्रिकेटर बापू नाडकर्णी यांच निधन

राजकोटच्या मैदानात भारतीय संघाला कोणत्याही परिस्थिती सामना जिंकायचा होता. फलंदाजीमध्ये शिखर धवन (९६), लोकेश राहुल (८०) आणि कर्णधार विराट कोहली (७८) धावांच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ३४१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. स्मिथनं संयमी खेळी करत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलण्याचा मानस केला होता. पण कुलदीपने त्याला तंबूचा रस्ता दाखवत भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. या सामन्यातील विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.