पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी फक्त संघासाठी नव्हे तर देशासाठी खेळतो : रोहित शर्मा

विराट कोहली आणि रोहित शर्मा

विंडीज विरुद्धच्या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी भारताचा सलामीवीर आणि वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक खास संदेश शेअर केला आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या पराक्रम करणाऱ्या रोहित शर्माने यापूर्वी सेमीफायनलमधील पराभव जिव्हारी लागल्याचे म्हटले होते. 

विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमधील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विंडीज दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने या चर्चेला पूर्ण विराम दिल्याचे पाहायला मिळाले. रोहितसह संघातील कोणत्याही खेळाडूसोबत मतभेद नसल्याचे कोहलीने स्पष्ट केले होते.   

रोहितसोबत कोणतेही मतभेद नाहीत : विराट कोहली

त्यानंतर आता रोहित शर्माने सोशल मी़डियाच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. मी केवळ संघासाठी खेळण्यास मैदानात उतरत नाही, तर मी देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मैदानात उतरतो, असे ट्विट रोहित शर्माने केले आहे. विराटसोबतच्या मतभेदासंदर्भातील चर्चेला रोहितनेही पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केल्याच्या दृष्टिने या ट्विटकडे पाहिले जात आहे. 

भारतीय संघ सध्या विंडीज विरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी फ्लोरिडामध्ये आहे. ३ आणि ४ ऑगस्टला भारतीय संघ विडींजविरुद्ध फ्लोरिडाच्या मैदानावर टी-२० सामना खेळणार आहे. त्यानंतर टी-२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना वेस्ट इंडिजमधील गयानामध्ये खेळवला जाईल. 

धोनीबाबतच्या प्रश्नावर एमएसके प्रसाद यांचा मास्टर स्ट्रोक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: india tour to west indies 2019 rohit sharma tweeted before t20 series i do not just walk out for my team i walk out for my country