पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विंडीजचा धाकड गडी वजन कमी करण्यासाठी करतोय मोठी कसरत

रहकीम कॉर्नवॉल

भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विंडीजने आपल्या ताफ्यात धाकड गड्याला संधी दिली आहे. रहकीम कॉर्नवॉलची संघात वर्णी लागल्यापासून तो चांगलाच चर्चेत आहे. जर पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजच्या टीम इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळाले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात धिप्पाड क्रिकेटर म्हणून एक अनोखा विक्रम त्याच्या नावे जमा होईल. 

श्रेयस अय्यर! टीम इंडियाच्या डोकेदुखीवरील जालीम उपाय

रहकीमची उंची ६ फूट ६ इंच असून त्याचे वजन तब्बल १४० किग्र इतके आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा सुरु असली तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो फार लांबचा पल्ला गाठू शकणार नाही अशी चर्चा देखील रंगत आहे. वजन कमी करण्यासाठी तो सराव शिबीरात सहभागी होणार आहे.  २६ वर्षीय रहकीम अष्टपैलू खेळाडू असून त्याने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर विंडीजच्या कसोटी संघात स्थान मिळवले आहे. मात्र, अधिक वजनामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसा यशस्वी ठरणार नाही, अशा प्रतिक्रिया त्याच्याबद्दल क्रिकेट जगतातून उमटत आहेत. 

काश्मीरच्या वादात सरफराजही उतरला मैदानात

'मिडडे' च्या वृत्तानुसार, रहकीम आता वजन कमी करण्यावर भर देत असल्याची माहिती विंडीज क्रिकेड मंडळाचे अध्यक्ष रिकी स्करिट यांनी दिली आहे. तो विडींज क्रिकेट मंडळाच्या न्यूट्रिनिस्ट आणि प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सराव करत आहे. त्याने स्थानिक स्तरावर ५५ सामने खेळले असून २४.४३ च्या सरासरीनं त्याने २ हजार २२४ धावा केल्या असून २३.६० च्या सरासरीने त्याने २६० बळी मिळवले आहेत.