पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गेल आउट, रसेल सावरला! पहिल्या दोन T20 साठी विडींज संघ जाहीर

गेल आउट रसेल इन

India Tour to West indies 2019: भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्यासाठी घोषणा केल्यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या दोन टी-२० सामन्यासाठी आपल्या संघाची घोषणा केली. टी-२० सामन्यांच्या मालिकेने भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. तीन सामन्यापैकी पहिले दोन सामने हे अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवण्यात येणार असून तिसरा सामना वेस्ट इंडिजच्या गयानाच्या मैदानावर रंगणार आहे. 

INDvsWI: चौथ्या क्रमांकासाठी कोण सक्षम ठरेल?

पहिल्या दोन टी-२० सामन्यांसाठीच्या १४ सदस्यीय संघात सुनील नरेन आणि केरन पोलार्ड यांना संधी देण्यात आली असून स्फोटक फलंदाज ख्रिस गेल बाहेर ठेवण्यात आले आहे. यष्टिरक्षक आणि फलंदाज एंथनी ब्रांबल टी-२० संघातील एकमेव  नवा चेहरा आहे. कर्णधार कार्लोस ब्रेथवेटच्या नेतृत्वाखालील संघात अष्टपैलू आंद्रे रसेलही दुखापतीतून सावरुन संघात परतला आहे. डाव्या पायच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे रसेलला विश्वचषकातून माघार घ्यावी लागली होती. 

विंडीज दौरा: पांड्या, बुमराहला विश्रांती, नव्या चेहऱ्यांना संधी

वेस्ट इंडिज निवड समितीचे मुख्य अध्यक्ष रॉबर्ट यांनी गेलला संघात स्थान न देण्याबाबतची भूमिकाही स्पष्ट केली. अनुभवी आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेल कॅनडा जीटी-२० स्पर्धेत खेळत असल्यामुळे त्याचा संघात सहभाग झालेलाना नाही, अशी माहिती त्यांनी दिली.    

वेस्ट इंडिजचा संघ
कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), सुनील नरेन, किमो पॉल, खारी पियरे, केरन पोलार्ड, निकोलस पूरन, रावमॅन पॉवेल, आंद्रे रसेल, ओशेन थॉमस, एंथनी ब्रांबल, जॉन कँपबेल, शेल्डन कोट्रेल, शिमरोन हेटमायेर, एविन लुईस.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india tour to west indies 2019 narine pollard recalled for first t20 internationals against india