पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND: जखमी रोहितच्या जागी या दोघांना मिळणार संधी

मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल

सलामीवीर रोहित शर्माला दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दौऱ्याला मुकावे लागणार आहे. रोहित शर्माच्या जागी एकदिवसीय सामन्यात मयांक अग्रवालचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असून  कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत एकदिवसीय मालिकेत लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉसोबत मयांक अग्रवालला तिसरा सलामीवीर असेल. शिखर धवनच्या अनुपस्थितीत घरच्या मैदानावर मयांक अग्रवालने दमदार कामगिरी केली होती. कसोटी मालिकेसाठी राहुल आणि पृथ्वी शॉसोबत शुभमन गिलला तिसरा सलामीवीर म्हणून स्थान मिळेल. 

NZvsIND : KL राहुलला 'टाइम मॅनेजमेंट' जमलं नाही, टीम इंडियाला दंड!

दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात गिलने राखीव सलामीवीर म्हणून संघासोबत होता. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध अनाधिकृत कसोटी सामन्यात शुभमनने ८३ आणि नाबाद २०४ धावांची खेळी केली होती. दोघांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी ती केवळ औपचारिकताच असेल. 

ICC Rankings: पाकचा गडी स्ट्राइकवर कायम, केएल राहुल नॉन स्ट्राइकला

न्यूझीलंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला होता. पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रोहित शर्माला स्नायू दुखापतीची समस्येला तोंड द्यावे लागले होते. ६० प्रचंड वेदना होत असल्यामुळे ६० धावांवर तो रिटायर हर्ट होऊन माघारी फिरला होता. त्याची ही माघार दौऱ्यातून माघारीचे संकेत असेल असा विचारही कोणी केला नव्हता. मात्र तो  उर्वरित दौऱ्यात भारतीय संघासोबत दिसणार नाही. भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात  तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत भारतीय संघ दमदार कामगिरी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india tour to new zealand ind vs odi series new zealand vs india test series mayank agarwal in odi team and shubman gill in test team will replace injured rohit sharma