पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टी-२० : विंडीज दौऱ्यात विराट-रोहितमध्ये रंगणार स्पर्धा

रोहित शर्मा आणि विराट कोहली

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील मतभेदाच्या चर्चेनंतर या दोघांच्यामध्ये आता स्पर्धा पाहायला मिळणार आहे.  ३ ऑगस्टपासून टी-२० मालिकेने भारताच्या विंडीज दौऱ्याला सुरुवात होत आहे. या मालिकेत दोघांच्यात टी-२०त सर्वाधिक धावा करण्याची स्पर्धा रंगेल. 

प्रशिक्षक निवडीसंदर्भात मत मांडण्याचा विराटला अधिकार : गांगुली

सध्याच्या घडीला रोहित शर्मा टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल आहे. तर कर्णधार विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने ९४ सामन्यात २ हजार ३३१ धावा केल्या आहेत. ज्यात ४ शतक आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलँडचा मार्टिन गप्टिल ७६ सामन्यात २ हजार २७२ धावांसह दुसऱ्या स्थानावर असून विराट कोहली ६७ सामन्यातील २ हजार २६३ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या विक्रमाचा वेगाने पाठलाग करणाऱ्या कोहलीने टी-२० त एकही शतक झळकावलेलं नाही. त्याने २० वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. 

रोहितसोबत कोणतेही मतभेद नाहीत : विराट कोहली

विराट आणि रोहित यांच्यात केवळ ६८ धावांचे अंतर आहे. विंडीज विरुद्ध भारतीय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत सरस कामगिरी करुन रोहित आपले अव्वल स्थान कायम राखणार की विराट कोहली अव्वलस्थानी झेप घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.