पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय संघात पुनरागमन करण्याचा मनीष पांडेला विश्वास

मनीष पांडे

भारतीय संघातून बाहेर असलेला मध्यफळीतील फलंदाज मनीष पांडे संघात पुनरागमन करण्याची आशा बाळगून आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात संघात स्थान मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. वेस्ट इंडिज अ विरुद्धच्या तिसऱ्या अनाधिकृत सामन्यात मनीष पांडेनं शतकी खेळी केली होती. या कामगिरीमुळे त्याने निवड समितीचे लक्ष वेधले असून वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने आयपीएलमधील चेन्नई विरुद्धच्या सामन्यातील अर्धशतकाने मनोबल उंचावल्याचे सांगितले. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर येवून झळकावलेले अर्धशतक हा या हंगामातील सर्वोत्कृष्ट क्षण होता, असे तो म्हणाला.

आता मुख्य प्रशिक्षक निवडीवेळी विराटची मनमानी चालणार नाही

आयपीएलमध्ये सनरायजर्सकडून खेळताना मनीष पांडेने १२ सामन्यात ३४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने फिटनेसवरही मेहनत घेतली आहे. फिटनेसमधील सुधारणा आणि भारत अ संघाकडून सातत्यपूर्ण चांगली खेळी केल्यामुळे पुन्हा भारतीय संघात स्थान मिळेल, असे वाटते. सध्याच्या घडीला सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू विजय शंकर दुखापतीतून सावरलेले नाहीत. याशिवाय विश्वचषकात भारतीय संघातील मध्यफळीतील फलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली होती. त्यामुळे वेस्ट इंडिज

सनरायजर्सचा आयपीएल प्रवास आता ट्रेव्हर बेलिस यांच्या मार्गदर्शनाखाली

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India tour of West Indies 2019 Manish Pandey Confident For Selection In Indian Cricket Team