पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI: ३ ऑगस्टपासून भारताचा विंडीज दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

३ ऑगस्टपासून भारताचा विंडीज दौरा

India Tour of West Indies 2019: आयसीसी विश्वचषकात सेमीफायनलमध्ये बाहेर पडलेला भारतीय संघ आता भविष्यातील वेळापत्रकावर लक्ष देण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभूत झाल्यानंतर भारताचा विश्वचषकातील अभियानाचा शेवट झाला. आपल्या पुढील दौऱ्यापूर्वी टीम इंडिया छोटासा ब्रेक घेईल. त्यानंतर ते विंडीज दौऱ्यावर जातील.

दि. ३ ऑगस्टपूर्वी सुरु होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर टीम इंडिया ३ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडिया ३ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत विंडीज दौऱ्यावर आहे. विंडीज दौऱ्यासाठी टीमची निवड १९ जुलै २०१९ रोजी होणार आहे. 

या दौऱ्यासाठी संघाची निवड करताना निवडकर्ते महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याबाबत निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर टीमचे प्रमुख खेळाडू विशेषकरुन वेगवान गोलांदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावरील सामन्याच्या ताणाचाही संघ व्यवस्थापन विचार करेल. या दोघांनी विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती.

स्मृती मानधना अन् रोहन बोपण्णा अर्जुन पुरस्काराने सन्मानित

निवडकर्त्यांना सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू विजय शंकर यांच्या फिटनेसकडेही लक्ष द्यावे लागेल. दोन्ही खेळाडू स्ध्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील पुनर्वसन केंद्रात आहेत. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली यालाही विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

भारताच्या विंडीज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

३ सामन्यांच्या टी-२० मालिकेने दौऱ्याची सुरुवात होईल.
पहिला टी-२० ३ ऑगस्ट, सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडिय़म, ठर्फ मैदा, लाडर हिल, फ्लोरिडा (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)

दुसरा टी-२०- ४ ऑगस्ट, सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडिय़म, ठर्फ मैदा, लाडर हिल, फ्लोरिडा (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)

तिसरा टी-२०- ६ ऑगस्ट, प्रोव्हिडन्स स्टेडिअम, गयाना,(भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)

ICC ODI Rankings : फलंदाजीत कोहली-रोहित तर गोलंदाजीत बुमराहचा दबदबा
 
तीन सामन्यांची वनडे मालिका
पहिला वनडे- ८ ऑगस्ट, प्रोव्हिडन्स स्टेडिअम, गयाना,(भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)

दुसरा वनडे- ११ ऑगस्ट, क्वीन्स पार्क, ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदाद (भारतीय प्रमाणवेळेनुसार सांयकाळी ७:०० वाजता)

तिसरा वनडे- १४ ऑगस्ट, क्वीन्स पार्क, ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदाद (भारतीय प्रमाणवेळेनुसार सांयकाळी ७:०० वाजता)

टीम इंडियासाठी BCCI ला हवा असा कोच!

कसोटी मालिका
पहिली कसोटी- २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडिअम, नॉर्थ साऊंड अँटिग्वा, (भारतीय प्रमासवेळेनुसार सायंकाळी ७.०० पासून)

दुसरा कसोटीः ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर, सबिना पार्क, किंग्स्टन, जमैका (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ पासून)