पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून विराट विश्रांती विना विंडीज दौऱ्यासाठी सज्ज

विराट कोहली

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. विश्वचषकानंतर कर्णधार विराट कोहलीही विश्रांती घेणार असल्याची चर्चा होती. पण निवड समितीने तिन्ही प्रकारातील नेतृत्वाची धूरा त्याच्याकडे दिल्यानंतर त्याच्या विश्रांतीच्या चर्चेला अधिकृतरित्या पूर्ण विराम मिळाला. यापूर्वी विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमधील पराभव जिव्हारी लागल्याने विराटने विश्रांती घेणे टाळल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र यावर आता कर्णधार विराट कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे. विंडीज दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. 

गावसकरांचे विराटसंदर्भातील वक्तव्य माजरेकरांना खटकलं

संघाचे फिजिओ किंवा ट्रेनर यांच्यासोबत विश्रांतीबाबत कोणताही संवाद झाला नसल्याचे विराटने म्हटले आहे. विराट कोहली म्हणाला की, आमच्या विश्रांतीच्या कालावधीची नोंद ठेवली जाते. यासंदर्भात फिजिओ आणि ट्रेनर भारतीय क्रिकेट मंडळाला यासंदर्भात ई-मेलवर पाठवतात. त्यांनी माझ्यासंदर्भात काय रिपोर्ट तयार केला हे माहित नाही. पण सातत्यपूर्ण चांगली कामगिरी होत असल्यामुळे फिजिओ किंवा ट्रेनर यांना मी तिन्ही प्रकारात खेळण्यास फिट असल्याचे वाटल्याने मला विश्रांती देण्याचा विचार केला नसावा, असेही विराट यावेळी म्हणाला.

रोहितसोबत कोणतेही मतभेद नाहीत : विराट कोहली

यावेळी विराट कोहलीने मध्यफळीतील फलंदाजांच्या कामगिरीवरही भाष्य केले. मध्यफळीतील कामगिरी समाधानकारक झाली नाही. परंतु मध्यफळीत निवडलेल्या प्रत्येकाच्यात सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे समर्थन करतो, असेही तो म्हणाला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india tour of west indies 2019 india vs west indies no one communicated virat kohli clears stand on being rested