पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND:उसळत्या खेळपट्टीवर यष्टिमागे कोण दिसेल? पंत, राहुल की सॅमसन...

विराट कोहली आणि केन विल्यमसन

न्यूझीलंडमधील ऑकलंडच्या मैदानातून २४ जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. मालिकेत दमदार कामगिरी करुन मालिका जिंकण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील. ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळवण्यात येणारा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सुरु होईल. 

'जितना उसके सिर पर बाल नहीं उतना मेरे पास माल है'

मायदेशात ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धची तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकत भारतीय संघ आत्मविश्वासाने न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. पण न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचे रेकॉर्ड फारसे समाधानकारक नाही. विराट कोहली अॅण्ड कंपनी न्यूझीलंडच्या मैदानातील रेकॉर्ड सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल.  विश्वचषकानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि श्रीलंका दौऱ्यावर दमदार कामगिरी केली आहे. पण न्यूझीलंडची परिस्थीत यापेक्षा वेगळी असणार आहे. दोन्ही संघासाठी खेळाडूंची दुखापतही देखील चिंतेचा विषय बनली आहे.

australian open सानियानं अर्ध्या सामन्यानंतर सोडली नादियाची साथ

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून आउट झाला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या ताफ्यातील अनुभवी जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ड दुखापतीमुळे टी-२० मालिकेला मुकणार आहे. मायदेशातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुखापतग्रस्त ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने फलंदाजीसह यष्टिमागे अप्रतिम कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील उसळत्या खेळपट्टीवर यष्टिमागची जबाबदारीची संधी कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

संभाव्य टीम इलेव्हन  
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह.

संभाव्य न्यूझीलंड इलेव्हन 
कॉलिन मुन्रो, मार्टिन गप्टिल, केन विल्यमसन (कर्णधार), टिम सीफर्ट, रोस टेलर, कोलिन डि ग्रँडहोम, डेरेल मिशेल, मिशेल सँटनर, इश सोढी, टिम साउदी, स्कॉट कगलिन.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india tour of new zealand ind vs nz 1st t20 international match nz vs ind india new zealand dream11 india expected playing xi new zealand expected playing xi