पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvNZ: खंदा फलंदाज खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकणार

शिखर धवन

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला आगामी न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागणार आहे. मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील बंगळुरुच्या मैदानावर झालेल्या अखेरच्या सामन्यात त्याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते.  
न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाला पाच सामन्यांची टी-२० मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका तसेच दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मोठ्या दौऱ्यापूर्वी धवनची दुखापतीमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. रणजी सामन्यादरम्यान जलदगती गोलंदाजही दुखापतग्रस्त झाला होता.

केंद्रीय क्रीडा समितीतून सचिन तेंडूलकर, विश्वनाथ आनंद बाहेर

१९ जानेवारीला बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना धवनला खांद्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या डावातील पाचव्या षटकात फिंचने टोलवलेला चेंडू पकण्यासाठी मारलेली डाइव्ह मारली होती. दुखापतीनंतर त्याने मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले होते. एवढेच नाही तर दुखापत गंभीर असल्यामुळे तो फलंदाजीसाठीही मैदानात उतरला नव्हता. त्याच्या जागी लोकेश राहुलला रोहितसोबत भारताच्या डावाची सुरुवात करावी लागली होती.  

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

भारतीय क्रिकेट मंडळाने यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हे देखील अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार, शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार नाही. भारतीय अ संघ सध्या न्यूझीलंडमध्येच आहे. त्यामुळे धवनची जागा भरुन काढण्यासाठी या संघातील एखाद्या खेळाडूची भारतीय संघात वर्णी लागू शकते. मयंक अग्रवाल याला अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय पृथ्वी शॉच्या नावाचा विचार होणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.    
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India tour of New Zealand 2020 shikhar dhawan roled out of new zealand tour after injuring his shoulder during australia odis sources