पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पृथ्वीचं दुखापत ग्रहण सुटले! न्यूझीलंड दौऱ्यावर 'शो' दाखवण्यास शॉ सज्ज

पृथ्वी शॉ

युवा सलामीवीर पृथ्वी शॉ खांद्याच्या दुखापतीतून सावरला असून न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यासाठी तो फिट असल्याचे वृत्त आहे.  न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय अ संघात त्याची निवड झाली होती. पण दुखापतीमुळे त्याला दौऱ्याला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात तो खेळणार नसल्याचे वृत्तही आले होते. 

लाजिरवाण्या पराभवानंतर रावळपिंडी एक्स्प्रेसचा विराट ब्रिगेडला सल्ला

पुढील ४८ तासांत पृथ्वी शॉ न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय अ संघासोबत जोडला जाणार आहे. रणजी चषकातील सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखापतीवरली उपचारानंतर बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याला निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला फिट घोषीत केल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्याचा त्याचा मार्ग खुला झाला आहे.   

सामन्यानंतर विराट म्हणाला मी चुकलो!

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ गुरुवारी किंवा शुक्रवारी न्यूझीलडला रवाना होणार आहे. त्याला संपूर्णपणे फिट घोषीत करण्यात आले आहे. भारत अ संघाकडून तो कशी कामगिरी करतो यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या पुनरागमनाचं गणित अवलंबून असेल. भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर दोन कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ भारतीय अ संघाकडून कशी कामगिरी करतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india tour of new zealand 2020 Prithvi Shaw Fit again set to join India A team in New Zealand