पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियाचा 'गेम प्लॅन' समजण्यापलिकडचा : कपिल देव

कपिल देव

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी वेलिंग्टन कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर टीका केली आहे. न्यूझीलंडने वेलिंग्टनच्या पहिल्या कसोटीत भारताला १० गडी राखून एकतर्फी पराभूत केले होते. टी-२० मालिकेतील पराभवानंतर न्यूझीलंड संघाने चांगली कामगिरी करत कमबॅक केले. एकदिवसीय मालिका आणि पहिल्या कसोटीत न्यूझीलंडच्या संघाने कमालीचा खेळ दाखवला. त्याबद्दल न्यूझीलंड संघ कौतुकास पात्र असल्याचे कपिल देव यांनी म्हटले आहे.  

...म्हणून या क्रिकेटर्संची ट्रम्प यांच्या विरोधात शाब्दिक फटकेबाजी

कपिल देव म्हणाले की, भारतीय संघाची सध्याची रणनिती समजण्यापलिकडची आहे. प्रत्येक सामन्यात एक नवा संघ मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. संघात कोणतीच जागा पक्की नाही. कोण-कोणत्या क्रमांकावर खेळणार याचे नियोजन नसेल तर त्याचा संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होत असतो, असेही त्यांनी सांगितले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे भारताचे आघाडीचे फलंदाज पहिल्या कसोटीमध्ये अपयशी ठरले होते. कर्णधार कोहलीने फलंदाजीतील अपयशामुळे पराभव झाल्याचे मान्य केले आहे.   

विराट म्हणतो, लाजिरवाणा पराभव डोक्यात ठेवणार नाही!

कपिल देव पुढे म्हणाले की, संघात चांगली क्षमता असणारे फलंदाज असताना दोन्ही डावात २०० धावांपर्यंत न पोहचणे म्हणजे संघात ताळमेळ नसल्याचे उदाहरण आहे. त्यामुळे संघाला रणनितीवर अधिक लक्ष द्यावे लागेल. फार्मात असलेल्या लोकेश राहुलला कसोटी संघात स्थान न मिळाल्याची नाराजीही कपिल देव यांनी यावेळी बोलून दाखवली. जेव्हा आमच्या खेळात आणि आज जे काही मैदानात दिसत आहे त्यात खूप मोठे अंतर आहे. संघ बांधणी करत असताना खेळाडूंना आत्मविश्वास द्यावा लागतो. बदलाचे प्रयोगाने फार काही साध्य होत नाही, असा टोलाही त्यांनी भारतीय संघाला लगावला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India tour of New Zealand 2020 kapil dev kl rahul india vs new zealand test series opening combination