भारतीय संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सन खांद्याच्या दुखापतीतून अद्याप सावरला नसून तो पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात खेळणार नसल्याचे न्यूझीलंडने क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्याच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम न्यूझीलंड संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे.
Under19 WC INDvsPAK सेमीफायनल सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर !
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात केन विल्यम्सनच्या खांद्याला दुखापत झाली होती. परिणामी तो अखेरच्या दोन टी-२० सामन्यातही मैदानात उतरला नव्हता. विल्म्सनच्या जागी दोन सामन्यांसाठी मार्क चॅम्पमॅनला संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंड संघाचे फिजिओ विजय वल्लभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, केन विल्यम्सनची दुखापत गंभीर नसल्याचे एक्स-रे आणि स्कॅन टेस्टमधून स्पष्ट झाले आहे. दुखापत वाढू नये याची खबरदारी म्हणून विल्यम्सला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या आठवड्यात तो फिटनेस ट्रेनिंग कायम ठेवण्यावर भर देईल, असे विजय वल्लभ यांनी म्हटले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
विल्यम्सनच्या जागी संधी मिळालेल्या चॅम्पमॅनने दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले होते. नुकत्याच भारत अ विरुद्ध झालेल्या सामन्यात एकदिवसीय आणि चार दिवसीय सामन्यात त्याने शतकी कामगिरी केली होती. या जोरावर भारताविरुद्ध त्याला टीम इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बुधवारी हेमिल्टनच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना रंगणार आहे.