पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IndvsNZ : टीम इंडियासोबत भिडण्यापूर्वीच न्यूझीलंडला वेदनादायक झटके

ट्रेंट बोल्ट

India Tour of New Zealand 2020: न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि यष्टिरक्षक आणि फलंदाज  टॉम लॅथम भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दोघेही दुखापतग्रस्त झाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बोल्टच्या उजवा हाताला फॅक्चर झाले. मिशेल स्टार्कच्या चेंडूवर तो जायबंदी झाला होता.  बोल्टची दुखापत गंभीर असून भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यात तो मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे, असे न्यूझीलंड प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी स्पष्ट केले आहे.  

Video: हा बाबा वर्ल्डकपमध्ये दमवणार, त्सुनामीची चाहूल देणारी हॅटट्रिक

गॅरी स्टीड यांनी बुधवारी यांसदर्भात वक्तव्य केले आहे.  डाव्या हाताच्या दुखापतीमुळे बोल्टला विश्रांती देण्यात आली आहे. आठवड्याभरात तो सरावाला पुन्हा सुरुवात करेल. पण भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो खेळेल हे सध्या सांगता येणार नाही.  दुसरीकडे सिडनीच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी लॅथमला दुखापत झाली होती. मार्नस लाबुशेनचा झेल घेताना तो जखमी झाला होता. एक्स रे मध्ये उजव्या हाताच्या बोटाला फॅक्चर असल्याचे समोर आले होते. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला जवळपास चार आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

भावा कुस्तीत दोस्ती नाय अन् कुस्तीनंतर अशी दोस्ती पण दिसायची नाय!

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ०-३ अशी क्लीनस्वीपची नामुष्की ओढावलेला न्यूझीलंडचा संघ मायदेशात टीम इंडियासोबत दोन हात करणार आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात ५ सामन्यांच्या टी-२० मालिका. ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका तर २ सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे. भारताचा न्यूझीलंड दौरा २४ जानेवारीपासून टी-२० च्या सामन्यांच्या मालिकेने सुरु होईल. या मालिकेमध्ये बोल्ट आणि लॅथम संघापासून दूर होणे न्यूझीलंडची डोकेदुखी वाढवणारे आहे. या दोघांशिवाय लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री हे देखील दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: India Tour of New Zealand 2020 ind vs nz Tom Latham breaks finger Trent Boult doubtful starter for T20 series vs India