पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND : आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात असं पहिल्यांदाच घडलं!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात अनोखा विक्रम

टीम इंडियाने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात दिमाखदार केली आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील ऑकलंडच्या मैदानात रंगलेला सलामीचा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सलामीच्या सामन्यात धावांची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करताना कॉलिन मुन्रो (५९), न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सन (५१) आणि रॉस टेलरच्या नाबाद ५४ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने निर्धारित २० षटकात २०३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताकडून दोघांनी अर्धशतकी खेळी केली. न्यूझीलंडच्या तिघांनी केलेल्या अर्धशतकावर भारतीय संघातील श्रेयस अय्यर (५८)* आणि लोकेश राहुल यांची (५६) अर्धशतकी खेळी भारी ठरली. 

NZvsIND : राहुल-विराटनं पाया रचला अन् श्रेयसने विजयाचा कळस चढवला!

दोन्ही संघाकडून टी-२० सामन्यात ५ अर्धशतकांची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदा घडले आहे. दोन्ही संघानी मिळून या सामन्यात प्रत्येकी १०-१० षटकार खेचले. या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाच्या रेकॉर्डमध्ये आणखी सुधारणा केली आहे.  २०० हून अधिक धावांचे आव्हान पार करण्याचा भारताने चौकार लगावला. चौथ्यांदा भारताने २०० हून अधिक धावांचे आव्हान पार केले आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने दोन वेळा २०० हून अधिकचे टार्गेट असताना विजय नोंदवला आहे. 

Video : रोहितचा भन्नाट झेल सोशल मीडियावर व्हायरल

यापूर्वी २०० हून अधिक धावांचे लक्ष्य पार करताना भारताने हैदराबादच्या मैदानात विंडीज विरुद्ध २०८ धावा (२०१९), मोहालीच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध २०७ धावा (२००९), राजकोटच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२ धावा (२०१३) करत भारताने विजय नोंदवला होता. मायदेशातील कामगिरीनंत भारताने पहिल्यांदाच परदेशी मैदानात असा पराक्रम करुन दाखवला आहे. ऑकलंडमधील या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास आणखी द्विगुणित होईल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India tour of New Zealand 2020 First instance of five 50 Plus scores in a T20I New Zealand vs India 1st T20 Record