ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेनंतर न्यूझीलंडमध्ये रंगणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. श्रीलंका दौऱ्यावर विश्रांती देण्यात आलेल्या रोहित शर्माचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. पण पुण्यातील मैदानात संधी मिळालेल्या संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर अवघ्या एका सामन्यात संधी दिल्यानंतर संजू सॅमसनला संघाबाहेर काढल्याचा बीसीसीआय निवड समितीचा निर्णय क्रिकेट चाहत्यांना चांगलाच खटकला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बीसीसीआयसह टीम इंडियाचा कर्णधार विराटसमोरही चाहत्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
कांगारुंच्या शिकारीसाठी या ११ वाघांना मिळू शकते संधी
संजू सॅमनला यापूर्वी बांगलादेश आणि वेस्टइंडीज विरुद्धच्या मालिकेतही संघात स्थान देण्यात आले. मात्र त्याला टीम इलेव्हनमध्ये संधी मिळण्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या पुण्यातील सामन्यापर्यंत वाट पाहावी लागली. या सामन्यात दोन चेंडूत त्याने ६ धावा केल्या. मिळालेल्या संधीच सोन करण्यात तो भलेही अपयशी ठरला असेल पण एका बाजूला पंतला अनेक संधी मिळत असताना संजू सॅमसनवर अन्याय होत असल्याच्या भावना ट्विटरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत.
@CricCrazyJohns You should speak against Kohli...Why is Samson dropped??...South Indians are ignored
— LM10 (@AmitkumarSrkian) January 12, 2020
KKR च्या त्या 'विक्रमी' खेळाडूला IPL मध्ये खेळता येणार नाही
न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहेत. २४ जानेवारीपासून ऑकलँडच्या मैदानातून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. याच मैदानात दुसरा सामना २६ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. २९ जानेवारीला हेमिल्टनच्या मैदानात तिसरा तर चौथा सामना ३१ जानेवारीला वेलिंग्टन आणि पाचवा आणि अखेरचा सामना बे ओवलच्या मैदानात २ फेब्रुवारीला नियोजित आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर.