पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : रिपोर्ट निगेटिव्ह! खेळाडू पुढील काही दिवस लॉकडाऊन राहणार

दक्षिण आफ्रिकेच्या संघातील काही खेळाडू

कोरोना विषाणूमुळे भारत दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतावे लागलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलाय. १६ सदस्यीय संघातील सर्व खेळाडूंची तपासणी करण्यात आली असून सर्वांचे रिपोर्ट्स हे निगेटिव्ह असल्याची माहिती संघाचे वैद्यकीय अधिकारी शोएब मंजरा यांनी दिली. सध्याची परिस्थिती पाहता संघातील खेळाडू पुढील दोन आठवडे लॉकडाऊच राहतील,अशी माहितीही त्यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोरांचा नाच!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १२ , १५  आणि १८ मार्च रोजी एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार होते. धर्मशाला येथील सामन्यावर पावसाने पाणी फिरवल्यानंतर लखनऊ आणि कोलकाता येथील उर्वरित दोन सामने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले. त्यानंतर १८ मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकाताहून दुबई मार्ग मायदेशी परतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना १४ दिवस क्वॉरंटाईनचा सल्ला देण्यात आला होता. 

कोरोनाशी लढाई: २.२ अब्ज लोकांकडे सतत हात धुवायला पाणीच नाही

दक्षिण आफ्रिकेतील जवळपास दिड हजार लोक जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. याठिकाणी आतापर्यंत पाच जणांनी कोरोनामुळे जीव गमावलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक स्पर्धा, युरोपातील फुटबॉल लीग, टेनिस कोर्टमधील विम्बल्डन आणि क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेवरही संकट कोसळण्याची शक्यता आहे.