पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Davis Cup : पाकला धक्का! भारताविरुद्ध बाहेर खेळावे लागणार

डेव्हिस चषक स्पर्धा कझाकिस्तानमध्ये रंगणा आहे.

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढती या पाकिस्तानमध्ये नाही तर कझाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहेत. २९ ते ३० नोव्हंबर दरम्यान ही स्पर्धा पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये नियोजित होती. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव या स्पर्धेतील लढती त्रयस्त ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. 
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) दोन्ही संघातील भारत-पाक यांच्यात रंगणारी स्पर्धा कझाकिस्तानची राजधानी  नूर सुल्तान याठिकाणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  

स्वप्नातही अंजिक्यला पिंक बॉलच दिसतोय

४ नोव्हेंबरला डेव्हिड चषक समितीने पाकिस्तानमधील सामने त्रयस्त ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे धाव घेत स्पर्धा पाकिस्तानमध्येच खेळवण्यासंदर्भात विनंती केली होती. कर्तारपूरला गेलेल्या भारतीय यात्रेकरुंचा दाखला देत त्यांनी पाकिस्तानमध्ये खेळाडूंच्या सुरक्षिततेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नसल्याचा दावा केला होता.  

T20 : 'अभय' खेळीनं नेगीची लोकेशच्या विक्रमाशी बरोबरी

एआयटीएच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान यांच्यातील सामने हे नूर सुल्तान या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. पाक टेनिस महासंघाच्या याचिकेसंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सप्टेंबरमध्ये होणार होता. मात्र खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सामन्याचे वेळापत्रक कोलमडले. डेव्हिस चषकातील दोन्ही संघातील सामने आता २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान कझाकिस्तानमध्ये खेळवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.