पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: नव्या आव्हानांची शमी अशी करतोय तयारी

मोहम्मद शमी

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला श्रीलंका दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. विश्रांतीच्या काळात शमी जीममध्ये मेहनत घेताना पाहायला मिळाले. मागील वर्षात शमीने दमदार कामगिरी केली होती. आगामी वर्षात तो कामगिरीतील सातत्य राखण्यासाठी विश्रांतीच्या काळातही घाम गाळताना दिसत आहे. मोहम्मद शमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो वेटलिफ्टिंगचा व्यायाम करताना दिसते. नव्या वर्षात नव्या आव्हानासाठी सज्ज आहे, या कॅप्शनसह त्याने हा व्हिडिओ शेअर केलाय.  

ndvsSL: टीम इंडिया इंदुरच्या मैदानातील विजयी इतिहास कायम राखणार?

शमीने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय २० सामन्यात ४२ बळी मिळवले आहेत. एवढेच नाही तर एकदिवसीय मध्येही त्याने दमदार कामगिरी केली होती. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत मोहम्मद शमी कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शमीने मागील वर्षातील विश्वचषक स्पर्धेत अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिकचा पराक्र केला होता. त्याच्याकडे भारतीय ताफ्यातील प्रमुख गोलंदाज म्हणून पाहिले जाते.  

JNU हिंसाचार: अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा ढासळते : इरफान पठाण

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेने भारतीय संघाने नव्या वर्षाची सुरुवात केली. गुवाहाटीच्या मैदानातील पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फिरवले. त्यानंतर इंदुरच्या मैदानावर दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. या मालिकेतून मोहम्मद शमीला विश्रांती दिलेली आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटीतील कामगिरीनंतर शमीने कसोटी क्रमवारीत आठ स्थानांनी सुधारणा करत सातव्या स्थानावर पोहचला होता. त्याच्या खात्यात आता ७९० गुण जमा झाले आहेत. कसोटी क्रमवारीत गोलंदाजीमध्ये ७९० रेटिंगपर्यंत पोहचलेल्या मोजक्या भारतीय गोलंदाजामध्येपैकी शमी एक आहे.  यापूर्वी कपिल देव (८७७) आणि जसप्रीत बुमराह (८३२) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India pacer Mohammed Shami gearing up for the challenges ahead india vs australia odi series