न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत यजमानांना ५-० असे लोळवले. भारतीय संघाने अखेरचा सामना जिंकत मालिकेचा शेवट गोड केला. पण सामन्यानंतर लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, सामोरे जावे लागले. संथगतीने षटके टाकल्याप्रकरणी संघाच्या मानधनातील २० टक्के रक्कम दंडात्मक स्वरुपात वसुल करण्यात येणार आहे. आयसीसीने नियमावलीच्या उल्लंघन झाल्याने ही कारवाई केली.
ICC Rankings: पाकचा गडी स्ट्राइकवर तर राहुल नॉन स्ट्राइकला
पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे होते. पण फलंदाजीदरम्यान तो दुखापतग्रस्त झाल्याने कार्यधार कर्णधार म्हणून यष्टिरक्षक लोकेश राहुलने जबाबदारी सांभाळली. आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती. त्याने यष्टिमागे आणि फलंदाजीमध्ये छाप सोडली असली तरी नेतृत्व मॅनेजमेंटमध्ये तो थोडा कमी पडल्याचेच या कारवाईतून दिसून येत.
NZvsIND : टीम इंडियाला मोठा धक्का! रोहितची दौऱ्यातून माघार
भविष्यात संघाच नेतृत्व करण्याची वेळ आली तर हा अनुभव त्याला नक्कीच फायदेशीर ठरेल. आयसीसीने कलम २.२२ नुसार निर्धारीत वेळेत षटके पूर्ण न केल्याने सुनावलेली शिक्षा रोहित शर्माने मान्य केली. त्यामुळे यावर वेगळी सुनावणी घेण्याची गरज नसल्याचंही आयसीसीने स्पष्ट केलं आहे. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला ७ धावांनी पराभूत केले होते.