पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC T20 World Cup : भारतीय महिला संघाची अंतिम फेरीत धडक

पावसामुळे गुरुवारचा उपांत्य फेरीतील सामना रद्द करण्यात आला.

आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय महिला संघाला गुरुवारी इंग्लंडविरोधात उपांत्य फेरीचा सामना खेळायचा होता. पण सिडनीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे स्पर्धेतील साखळी सामन्यातील गुणांच्या जोरावर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. अ गटामध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. भारतीय महिला संघाने साखळी फेरीत चारही सामने जिंकले. 

कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या इटलीमध्ये १०० पार

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या आयसीसीच्या महिला टी-२० विश्वचषकात भारतीय महिलांनी दिमाखदार कामगिरी करत चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली होती. भारतीय महिलांची आतापर्यंतची कामगिरी पाहता यंदा भारतीय महिला विश्वविजेत्या होऊन मायदेशी परततील असेच चित्र दिसत आहे.

इराणमधून आलेल्या ४९५ जणांचा पत्ता नाही; आरोग्य मंत्रालयाची वाढली चिंता

भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात होती. पण पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.